Main Featured

दिशा पटानीने बटरफ्लाय किकचा व्हिडीओ केला शेअर

disha patani
Entertainment News- बॉलिवूडच्या (bollywood)टॉप अभिनेत्रींमध्ये मोजली जाणारी अभिनेत्री दिशा पटानी (disha patani) आपल्या फिटनेसबाबत फारच सजग राहते. आपल्या वर्कआउटचे व्हिडीओज आणि फोटोज ती नेहमीच सोशल मीडियावर (social media)शेअर करत असते. नुकताच तिने तिच्या बटरफ्लाय किकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. दिशा पटानीची ही बटरफ्लाय किक पाहून तिचा कथित बॉयफ्रेन्ड टायगर श्रॉफ आणि त्याची आई आयशा श्रॉफ फिदा झाली आहे.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…सोशल मीडियावर (social media) अनेक फॉलोअर्स असणाऱ्या दिशा पटानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गुरूवारी एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती बटरफ्लाय किक करताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने 'बटरफ्लाय किक' असं कॅप्शन दिलं आहे. पटानीच्या व्हिडीओवरर कमेंट करत टायगर श्रॉफने 'क्लीन' तर आयशा श्रॉफने 'दिशू' असं लिहिलंय.
बटरफ्लाय किक ही मार्शल आर्टमधील एक जंपिंग किक आहे जी निगल किकच्या रूपातही ओळखली जाते. दिशाची ही किक पाहून काही यूजर्सनी काही मजेदारही कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, टायगरसोबत राहूनच तू अशी झाली आहे. हा त्याचाच प्रभाव आहे.


दिशाच्या कामाबाबत सांगायचं तर ती सलमान खानच्या आगामी 'राधे-युअर मोस्ट वॉन्टेड भाई' च्या शूटींगमध्ये बिझी आहे. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुड्डा यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा यावर्षी ईदला रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याचं काम शिल्लक राहिलं आहे.