chennai super kings
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्यात झालेला सामना CSKने 10 धावांनी गमावला. खरतर हा सामना चेन्नईचं (chennai super kings)जिंकणार असे वाटत होते, मात्र मधल्या फळीतीली फलंदाज सपशेल अपयशी ठरले. धोनी (ms dhoni)आणि केदार जाधव यांनी धिम्या गतीनं फलंदाजी केली. मात्र पराभवानंतरही सध्या धोनीच्या कॅचची चर्चा होत आहे.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीनं विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. धोनीला चांगली फलंदाजी करता आली नाही मात्र एक जबरदस्त कॅच घेत 39 वय असलं तरी मी अजूनही फिट आहे हे दाखवून दिलं. धोनी काल आयपीएलमधला आपला 197वा सामना खेळत होता.

या सामन्यात टॉस जिंकत कोलकातानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटच्या ओव्हरमध्ये कोलकातानं तीन विकेट गमावल्या. ड्वेन ब्राव्होच्या 19व्या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर धोनीनं जबरदस्त कॅच घेतला.

धोनीनं आधी आपल्या डावा हाताचे ग्लोव्ह्ज काढले, आणि कॅच घेतला. मात्र त्याच्या हातातून कॅच निसटला, तेव्हा धोनीनं हवेत डाइव्ह मारत एका हातानं पुन्हा कॅच घेतला.मात्र या सामन्यात चेन्नईला (chennai super kings) विजय मिळवता आला नाही. कोलकात्याने दिलेल्या 168 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना फाफ ड्यु प्लेसिस आणि शेन वॉट्सनने चेन्नईला 3.4 ओव्हरमध्येच 30 रनची पार्टनरशीप करून दिली. ड्यु प्लेसिस आऊट झाल्यानंतरही वॉटसनने रायुडूच्या मदतीने कोलकात्याच्या बॉलरवर आक्रमण सुरूच ठेवलं. 

मात्र यानंतर चेन्नईची पडझड सुरू झाली. 12 ओव्हरपर्यंत चेन्नईची सामन्यावर पकड होती. मात्र रायडू बाद झाल्यानंतर धोनी मैदानाता आता. त्यानं 12 चेंडूत केवळ 11 धावा केल्या आणि बाद झाला. धोनी (ms dhoni) बॅटिंग करत होता तेव्हा संघाला 47 चेंडूत 69 धावांची गरज होती.

चेन्नईनं 12 ओव्हरमध्ये एक विकेट गमावत 99 धावा केल्या होत्या. तर, पुढच्या 48 चेंडूत 69 धावा करण्याची गरज होती, तेव्हा 9 विकेट गमावल्या. या 48 चेंडूंपैकी 20 चेंडूंवर एकही धाव काढली नाही. यातील 12 चेंडू केदार जाधवनं खेळल्या.