आयपीएल टी-20 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत सध्या प्लेऑफची स्पर्धा वाढली आहे. साखळी फेरीचे काही सामने शिल्लक असून जवळपास पाच संघांमध्ये प्लेऑफमध्ये जाण्याची स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) पराभव केल्याने मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला आहे.

या पराभवामुळे कोलकात्याच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडली आहे. पण चेन्नईच्या विजयांमुळे ते इतर संघांचे गणित बिघडले आहे. आधीच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (Royal Challengers Banglore) पराभव आणि त्यानंतर गुरुवारी शाहरुख खानच्या कोलकात्याचा पराभव केल्याने त्यांच्या प्लेऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्गात अडथळे निर्माण केले आहेत. त्यामुळे कोणत्या समीकरणाच्या आधारे कोलकाता प्लेऑफमध्ये पोहोचेल जाणून घ्या-

पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स

सध्या पॉईंट टेबलमध्ये कोलकाता पाचव्या स्थानावर आहे. कोलकात्याच्या 13 मॅच झाल्या असून यामध्ये त्यांचे 12 पॉईंट्स आहेत. यामध्ये त्यांनी 6 विजय तर 7 सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यातच कोलकात्याचा नेट रनरेट देखील खूप खराब आहे. सध्या त्यांचा नेट रनरेट -0.467 आहे.

Must Read 


काय आहेत समीकरणं?

गुरुवारी चेन्नईविरुद्ध (Chennai Super Kings)  पराभव झाल्याने आता कोलकाता जास्तीतजास्त 14 पॉईंट्स मिळवू शकतात. त्यामुळे प्लेऑफमध्ये प्रवेश करणे त्यांच्यासाठी सोपं नाही. त्यामुळे आता कोलकात्याला इतर संघांच्या पराभवाचीदेखील प्रार्थना करावी लागणार आहे.

-कोलकात्याला प्लेऑफमध्ये जायचं असेल तर पंजाबचा दोन्ही सामन्यांत पराभव होण्यासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.

-राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबादला एकापेक्षा जास्त सामन्यात विजय मिळवता येऊ नये यासाठी प्रार्थना करावी लागेल. या संघांचे प्रत्येकी दोन सामने बाकी आहेत.

-त्यामुळे कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहील. आणि 14 पॉइंट्ससह ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

-नेट रनरेटच्या बाबतीत कोलकात्यानंतर केवळ राजस्थान रॉयल्स आहे. पण उरलेल्या दोन सामन्यांत विजय मिळवून ते आपला रनरेट सुधारू शकतात.

-त्यामुळे कोलकात्याला शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्याबरोबरच इतर संघांवरदेखील अवलंबून रहावं लागणार आहे.

-दरम्यान, मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरदेखील प्लेऑफच्या जवळ आहे. उरलेल्या दोनपैकी एका सामन्यात या दोन्ही संघांना विजय मिळवणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांचादेखील मार्ग अवघड ठरू शकतो.