video viral on social media
गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर (Chandrakant Babu Kavlekar) यांनी सोमवारी राज्य सायबर सेलला दिलेल्या तक्रारीत त्यांचा मोबाइल फोन हॅक झाल्याची तक्रार करत त्याच्या फोनवरून व्हाट्सअॅप ग्रुपवर (whatsapp group)आक्षेपार्ह व्हिडीओ क्लिप पाठविण्यात आल्याचा दावा केला आहे. चंद्रकांत कवळेवर यांनी सांगितले की, हा व्हिडीओ पाठवण्यात आला तेव्हा ते झोपले होते. या प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी कवळेकर यांनी केली आहे.

चंद्रकांत कवळेकर यांनी सायबर पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 'ही क्लिप त्यांच्या फोनवरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविली गेली होती. ते म्हणाले की, 'काही सामाज कंटकांनी 'Villages of Goa' या ग्रुपवर अश्लील व्हिडीओ पाठवला.

Must Read

कठोर कारवाईची केली मागणी

उपमुख्यमंत्री म्हणाले की, हा व्हिडीओ फक्त एका ग्रुपमध्ये (whatsapp group) पाठवण्यात आला आहे. जेव्हा हा मेसेज पाठवण्यात आला तेव्हा मी झोपलो होतोय काही दिवसांपासून माझे नाव बदनाम करण्यासाठी आणि माझी खोटी प्रतिमा लोकांसमोर आणण्यासाठी असे बरेच प्रयत्न केले जात आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी पोलिसांना लिहिले की, 'माझ्या मोबाईल फोनमध्ये छेडछाड करुन अश्लील व्हिडीओ पाठविणाऱ्यांवर सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मी मागणी करतो'.

दुसरीकडे विरोधी पक्षाने उपमुख्यमंत्र्यांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे. सोमवारी पहाटे 1.20 वाजता व्हाट्सअॅप ग्रुपवर अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप केल्याने गोवा कॉंग्रेसने कवळेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिलांनी केलेल्या तक्रारीत कवळेकर यांच्या विरोधात एफआयआरची मागणी केली गेली आहे.