bank money


तुम्ही जर बँक (bank) खात्याचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण बँकेच्या काही महत्त्वाच्या नियमात पुढील महिन्यापासून बदल होणार आहेत. बँकेकडून आधीपासून एसएमएस सुविधा, मिनिमम बॅलन्स, एटीएम (ATM) आणि चेकबुकचा वापर इ. सुविधांवर बँकेकडून शुल्क आकारले जाते. मात्र आता यामध्ये आणखी एक सुविधा समाविष्ट होत आहे. 




आता ग्राहकांना पैसे जमा करणे आणि काढण्यासाठी देखील काही निश्चित शुल्क द्यावे लागणार आहे. याची सुरुवात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने केली आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया, पीएनबी, अॅक्सिस बँक आणि सेंट्रल बँक याबाबत त्यांचा निर्णय लवकरच घेणार आहेत. 1 नोव्हेंबर 2020 पासून निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा हे व्यवहार केल्यावर ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागणार आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड


अशी माहिती मिळते आहे की, बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) चालू खाते, कॅश क्रेडिट लिमिट आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे तर बचत खात्यातून पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वेगळे शुल्क निर्धिरित केले आहे. पुढील महिन्यापासून ग्राहक लोन खात्यासाठी महिन्यातून 3 वेळानंतर जेवढे वेळा पैसे काढतील, तेव्हा त्यांना 150 रुपये द्यावे लागतील.

केवळ तीन वेळा बँकेत पैसे भरणे असेल मोफत

बचत खात्याबाबत  (bank) बोलायचे झाले तर, अशा खातेधारकांना तीन वेळा पैसे जमा करणे मोफत असेल. मात्र तर चौथ्या वेळी पैसे भरायचे असतील तर त्यांना 40 रुपये द्यावे लागतील. ज्येष्ठ नागरिकांना देखील यामध्ये कोणतीही सवलत नाही आहे. जनधन खातेधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांना पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे पण पैसे काढण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील

कोणत्या खात्यासाठी किती असेल शुल्क?

-सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खातेधार प्रति दिन एक लाख रुपये जमा करू शकतील. ही सुविधा नि:शुल्क असेल. मात्र याहून अधिक पैसे भरण्यासाठी शुल्क द्यावे लागेल

-अशा ग्राहकांना एक लाखापेक्षा अधिक रक्कम भरण्यासाठी प्रत्येक एक हजार रुपयांवर एक रुपया चार्ज द्यावा लागेल. याकरता कमीत कमी शुल्क 50 रुपये आणि जास्तीत जास्त 20 हजार रुपये आहे.

-जर सीसी, चालू आणि ओव्हरड्राफ्ट खात्यातून एका महिन्यात तीन वेळा पैसे काढले तर कोणतेही शुल्क नाही आहे.

-या खात्यातून चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 150 रुपये द्यावे लागतील

बचत खातेधारकांसाठी असेल एवढे शुल्क

बचत खातेधारकांसाठी तीन वेळा रक्कम जमा करणे नि:शुल्क असेल. चौथ्यांदा पैसे जमा करण्यासाठी 40 रुपये द्यावे लागतील. पैसे काढण्याबाबत बोलायचे झाले तर तीन वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे. चौथ्यांदा पैसे काढण्यासाठी 100 रुपये शुल्क आहे.