Main Featured

गाढ झोप करोनापासून बचाव करते?

good sleep immunity
रात्रीची चांगली झोप खरंच महत्वाची असते हे आपण वारंवार ऐकलं असेलच. पण ही सात ते आठ तासांची झोप (sleep) खरचं इतकी का गरजेची 
(immunity) असते? त्याचा सध्याच्या करोनापासून बचावाशी काही संबंध आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असतील. या प्रश्नांना तज्ज्ञ डॉक्टरांनी उत्तरं दिली आहेत. डॉक्टर (doctor) यावर काय म्हणतात पाहू.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


दिल्लीतील तिर्थनकार महावीर मेडिकल कॉलेजचे इंटरनल मेडिसीन विभागाचे प्रा. डॉ. जिगर हरिया, मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. गुप्ता, बी. एल. कपूर रुग्णालयाचे छाती आणि श्वसनासंबंधी विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ संचालक डॉ. संदीप नायर तसेच गंगाराम सीटी हॉस्पिटलचे नाक-कान-घसा विभागाचे डॉ. जसवीर सिंह यांनी इंडिया टुडेशी बोलताना झोप आणि करोनाचा (corona)संसर्ग याबाबत आपली मतं व्यक्त केली आहेत.

डॉ. हरिया आणि डॉ. गुप्ता म्हणतात, “आरामदायी जीवनशैलीपेक्षा झोप ही आपली गरज आहे. झोपेदरम्यान आपलं शरीर पुन्हा ऊर्जा प्राप्त करण्याच आणि दुखापती भरुन काढण्याचं काम करतं असतं. झोपेच्या काळात पेशींचे प्रमाण वाढते तसेच नव्याने तयार होत राहतात. त्यामुळे झोप आणि चयापचय क्रिया चांगली होऊन ती आपल्या शरिरात प्रतिकारशक्ती (immunity)निर्माण करते.

सर्वसाधारण झोप आणि उठण्याचं चक्र हे प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींवर परिणाम करतात. जसं टी सेल्स (शरिरातील सैनिक) आणि सायटोकिन्स (शरिरातील हत्यारं) हे झोपेदरम्यान मोठ्या प्रमाणावर कार्यान्वीत होतात. त्यामुळे प्रतिकार करणाऱ्या पेशींची संख्या वाढते. त्यामुळे एकप्रकारे अपुरी झोप तुमच्या शरिराचं संरक्षण आणि गंभीर आजारांपासून सुरक्षेबाबत तडजोड करते. त्याचप्रकारे कोविड-१९ आजार हा देखील अपुऱ्या झोपेमुळे बळावू शकतो. कारण पुरेसी झोप नसेल तर तुमच्यामध्ये तणाव, चिंता ही लक्षण दिसून येतात जी तुमच्यातील प्रतिकारशक्ती कमी करतात.”

डॉ. नायर म्हणतात, “झोपेशी तडजोड करु नका. दररोज किमान ७ ते ८ तास झोपं घ्या. तुमच्या शरिराची प्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाहीत तर तुम्हाला कंटाळवाणं वाटेल कारण तुमच्या मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झालेला असेल. अपुरी झोप तुमच्या शरिराच्या कार्यपद्धतीवर परिणाम करेल ज्याचा थेट तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होईल. आपल्या शरिरातील विषारी घटक झोपेदरम्यान निष्क्रिय असतात त्यामुळे शरीर मोठ्या प्रमाणावर मेंदूशी संपर्कात राहते आणि त्यामुळे आपलं शरीर आणि मन तणावरहीत राहत.”

पाच तासांपेक्षा कमी झोप ही कोविड-१९साठी हायरिस्क असते?

यावर डॉक्टर सिंह ठामपणे सांगतात की, “जी व्यक्ती पूर्ण झोप घेत नाही त्याला विविध आजार जडण्याची जास्त शक्यता असते. डॉ. हरिया आणि डॉ. गुप्ता म्हणतात, कमी झोप ही तुमच्यामध्ये खराब प्रतिकारशक्ती तयार करते. त्यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. कमी झोप हे कार्डियाक अॅरेस्टचं प्रमुख कारण बनलं आहे. डॉ. नायर म्हणतात, कमी झोप आपल्या प्रतिकार शक्तीला कमजोर करते. यामुळे आपल्याला श्वसानाचे, सर्दीचे आणि इतर आजार होतात. त्यामुळे कोविड-१९ पासून बचावासाठी आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचं असताना ती कमी झाल्यास सहाजिकच पाच तासांपेक्षा कमी झोप ही कोविड-१९ साठी हायरिस्क असते, असं डॉक्टरांचं मत आहे.