dedication-three-works-cell-sangli-today

Sangali भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील Chandrakantdada Patil यांच्या हस्ते महापालिका क्षेत्रातील सात कोटी 12 लाखांच्या रस्ते, ड्रेनेज पाईप लाईन, आरोग्य केंद्र आदी विकासकामांचा प्रारंभ उद्या (ता.29) होणार आहे. मंगलधाम येथील आपत्ती व्यवस्थापन कक्षासह दोन कोटी 18 लाखांच्या तीन कामांचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर गीता सुतार, भाजपचे नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी दिली. 

महापौर सुतार म्हणाल्या,""उद्‌घाटन व लोकार्पण सोहळ्यास खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ Sudhir Gadgil , सुरेश खाडे उपस्थित राहणार आहेत. सांगलीवाडी येथे सकाळी दहा वाजता इस्लामपूर रोडवरील हॉटेल यश ते तातुगडे मळ्यापर्यंत ड्रेनेजच्या एक कोटींच्या कामाचा प्रारंभ होणार आहे. शाळा नंबर नऊजवळ 90 लाख 45 हजार रुपये खर्चाच्या बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. सांगलीवाडी गावठाण परिसरात नव्या जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्याचे लोकर्पण केले जाईल. 

Must Read 

1) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

3) 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील शनायाने शेअर केला साडीतला फोटो

4) Gold Price Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर पुन्हा एकदा वधारलं सोनं,

5) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

6) युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल....


आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे (सिटी कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर) लोकार्पण यावेळी होईल. दुपारी बारा वाजता मिरजेतील मालगाव रोडवरील कलावती मंदिर शेजारी 55 लाखाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाचा तसेच पुजारी चौक ते रेल्वे ब्रिज रस्ता हॉटमिक्‍स डांबरीकरणाचा प्रारंभ केला जाईल. मिरज शिवाजीनगर येथे विकसित केलेल्या उद्यानाचे लोकार्पण होईल. 
उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, गटनेते युवराज बावडेकर, धीरज सुर्यवंशी, संदीप आवटी, निरंजन आवटी, संजय यमगर, सविता मदने, उर्मिला बेलवलकर, गीतांजली पाटील उपस्थित होते. 

सांगली, मिरजेत दोन ट्रिमिक्‍स रस्ते 
स्थायी समितीचे माजी सभापती संदीप आवटी यांच्या काळात मंजूर झालेल्या तीन कोटी 67 लाखांच्या दोन ट्रिमिक्‍स रस्त्यांच्या कामाचा प्रारंभ चंद्रकांतदादांच्या हस्ते होईल. महापालिका क्षेत्रात प्रथमच राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर रस्ते होत आहेत. सांगलीत राम मंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवर सातत्याने पाणी साचून रस्ता खराब होत असे. ट्रिमिक्‍स कॉंक्रीटमुळे हा प्रश्‍न कायम स्वरुपी निकालात निघेल. मिरज येथील शिवाजी रोड हॉटेल सुखनिवास ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ताही ट्रिमिक्‍स कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे, असे इनामदार म्हणाले.