ichalkaranji

Ichalkaranji- शहरात वृक्षांच्या मुळावरच घाव घालण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. त्यामुळे शहरातील समृद्ध वृक्षसंपदा (tree plantation) भविष्यात डेंजर झोनमध्ये येण्याची भीती आहे. गेल्या आठवड्यात दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये 14 झाडे तोडल्याबद्दल पाच जणांवर गुन्हाही नोंद झाला आहे. 

पालिका प्रशासनाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे सोपस्कर केले जात आहेत. पण त्यातून बेकायदेशीरपणे होणाऱ्या वृक्षतोडीला पूर्णतः पायबंद बसलेला नाही. एकीकडे वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे वृक्षांची होणारी कत्तल उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजीसाठी धोकादायक बनत चालली आहे. 

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं


इचलकरंजी औद्योगिक नगरी (industrial area) आहे. त्यामुळे सर्वच प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. विशेष करून हवा प्रदूषण नियंत्रणात राहण्यासाठी वृक्षलागवड (tree plantation)  हि महत्त्वाची आहे. त्यासाठी सातत्याने वृक्ष लागवडीसाठी मोठा निधी शासनाकडून प्राप्त होत असतो. पण यातून वृक्षांची लागवड किती सफल होते, हा वादाचा विषय यापूर्वीच ठरला आहे. पालिकेने यापूर्वी वृक्षगणना केली आहे. 6 इंचापेक्षा जास्त खोड असलेली सुमारे 3 लाख 3 हजार विविध प्रकारचे वृक्ष आहेत. शहरात इतकी मोठी वृक्षसंपदा आहे. पण हळूहळू यावर कुऱ्हाड चालवण्याच्या प्रवृत्तीत वाढ होत आहे. 

बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्यामुळे पालिका प्रशासनाकडून पोलिसांत संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे शहरात वृक्षांची होणारी खुलेआम कत्तल चर्चेत आली आहे. मुळात पर्यावरण प्रेमी नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनेक वृक्षांना जीवदान मिळाले आहे. त्यांच्या दक्षतेमुळेच अशा प्रकारांवर आळा बसत आहे. पण यासाठी पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे. 

होर्डिंग्ज बंदीमुळे वृक्षतोडीला ब्रेक 

शहरात होर्डिंग्ज उभारण्यासाठी वृक्षतोड केली जात होती; पण होर्डिंग्ज उभारण्यावर बंदी घातल्यामुळे अनेक मोकाच्या ठिकाणी असलेले वृक्ष वाचले आहेत. 

वृक्ष दर हा 50 टक्‍यांहून कमी

मुळात इचलकरंजी शहराची भौगोलिक परिस्तिथी पाहता, वृक्ष दर हा 50 टक्‍यांहून कमी आहे. त्यात प्रसाशनाच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे राजरोस फांद्या तोडण्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल केली जाते. यावर सक्षम पर्याय म्हणजे नियमांची कडक अंमलबजावणी व एखाद्या वृक्षासंदर्भात फांद्या तोडण्याची परवानगी घेतली असेल तर पहिल्यांदा त्या वृक्षाचे चोहो बाजूंनी फोटो काढणे व फांद्या तोडल्यानंतरचे चोहो बाजूंनी फोटो काढणे बंधनकारक करावे.