daily-for-glowing-skin-myupchar

अयोग्य जीवनशैली किंवा तणावामुळे त्वचेवर (skin) कमी वयातच सुरकुत्या पडतात. अयोग्य आहार, धूम्रपान, मद्यपान यासारख्या सवयींमुळे त्वचेची चमक कमी होते. मुरुम येणं ही त्वचेची आणखी एक सामान्य समस्या. शरीरात होणार्‍या संप्रेरक बदलांमुळे किंवा काहीवेळा खराब पचनामुळे त्वचेच्या समस्या उद्भवतात. कारण काहीही असो त्वचेशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि त्वचेला पुन्हा तजेलदार बनवण्यासाठी योगा (yoga) फायदेशीर ठरू शकतो.

अशी काही योगासनं आहे, ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार बनण्यास मदत होते. या योगासनांचा अभ्यास केल्यास डोकं आणि चेहर्‍याजवळील भागात रक्तप्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिकरित्या सौंदर्य मिळतं. त्याच वेळी उलट्या दिशेनं म्हणजेच डोकं टेकून केलेल्या आसनांद्वारे मेंदूमध्ये प्राणवायू आणि रक्ताचा प्रवाह अधिक होऊ शकतो. ज्यामुळे मज्जासंस्थेचं कार्य सुधारते, चयापचय दर वाढतो आणि ऊर्जाही वाढते.

कोणकोणती योगासनं त्वचेसाठी कशी फायदेशीर आहेत पाहुयात.

सर्वांगासन

myupchar.com च्या डॉ. अप्रतिम गोयल यांनी सांगितलं, सर्वांगासन केल्यानं त्वचा सैल कमी होते आणि त्यामुळे सुरकुत्यादेखील कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील मुरुमंही दूर होतात. हे आसन डोक्याला रक्तपुरवठा करून आळशीपणापासून मुक्त होण्यास मदत करते.

उर्ध्व धनुरासन

या आसनाला चक्रासनदेखील म्हणतात. या आसनादरम्यान शरीर धनुष्याच्या आकारात असतं. या आसनात डोकं खाली टेकलेलं असतं ज्यामुळे रक्तप्रवाह अधिक होतो.चेहऱ्याची चमक सुधारण्यास मदत करतं. ही प्रक्रिया अवघड आहे मात्र नियमितपणे याचा अभ्यास केल्यास कंबरेमध्ये लवचिकता येते. हे आसन फुफ्फुसांमध्ये प्राणवायूचा प्रवाह वाढवतं तसंच पचन सुधारतं.

Must Read 

1) 'सिंघम'ची हिरोईन अडकली लग्नाच्या बेडीत PHOTO VIRAL

2) राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप

3) रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस

4) ‘तारक मेहता’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी

5) तुमची कंगना तर आमची उर्मिला !

6) 'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल

शीर्षासन

शीर्षासन हा सर्व आसनांचा राजा मानला जातो. सुरुवातीला हे अवघड वाटतं पण त्याचे बरेच फायदे आहेत. यापैकी एक फायदा म्हणजे सौंदर्य आणि त्वचेचं आरोग्य राखणं. हे आसन केल्यामुळे डोकं खालच्या बाजूला वळतं ज्यामुळे चेहऱ्याला प्राणवायू पोहोचतो आणि रक्त परिसंचरण चांगलं होतंं आणि चेहऱ्यावर चमक येते. याच्या अभ्यासासह सुरकुत्या अदृश्य होतात.

हलासन

या आसनातील शरीराची स्थिती नांगराप्रमाणेच आहे जी थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि संप्रेरकांना नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हे आसन पचन सुधारतं आणि पोटातील समस्या दूर करतं. इतकंच नाही तर हे मुरुमांच्या समस्यांपासून मुक्त करतं.

उत्तानासन

या आसनात उभे राहून चेहऱ्यावरील रक्त प्रवाह वाढतो, ज्यामुळे त्वचा उजळ होण्यास मदत होते. हे आसन त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यात मदत करतं.

प्राणायाम

मुरुमांची समस्या शरीरात जास्त उष्णतेमुळे उद्भवते आणि याचा परिणाम त्वचेवर होतो. प्राणायाम शरीर थंड करतं. तेजस्वी त्वचेसाठी, अनुलोम-विलोम, शीतली प्राणायाम आणि कपालभाती प्राणायाम केले पाहिजेत. यामुळे नाडीत शुद्ध प्राणवायू प्रवाहित होतो आणि त्वचेला चमक मिळते.