Main Featured

सावधान! फेसबुकच्या माध्यमातून होतेय फसवणूक


cybercriminals-use-social-media-facebook-for-fraud

 सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणुकीचे रोज नवीन प्रकार समोर येत आहेत. मात्र, सध्या फसवणुकीचा एक सगळ्यात सोपा आणि नवीन मार्ग पाहायला मिळत आहे, तो म्हणजे कोणाचंही फेसबुक (Facebookअकाउंट बनवून त्याच्या फ्रेंडलिस्ट मधील असलेल्या लोकांकडून पैसे मागणं. काही लोकं याला बळी सुद्धा पडली आहेत.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


फेसबूक या माध्यमाने नव्या लोकांची मैत्री होती, ज्या मित्रांच्या संपर्कात नव्हते त्यांचा सहज संपर्क होत होता. मात्र, आता या फेसबुकचा वापर आर्थिक फसवणूक (Financial fraud) करण्यासाठी केला जात असल्याचं समोर आलेल आहे. याला सध्या फसवणुकीचा नवीन ट्रेंडच म्हणावा लागेल. जो सर्वात सोपा आहे. कुठल्याही व्यक्तीचा एक फेसबुक अकाउंट बनवून मेसेंजरद्वारे त्यांच्या फ्रेंडलिस्ट मधील असलेल्या लोकांकडून पैसे मागायचे आणि ऑनलाईन ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये मागून घ्यायचे.