Main Featured

…म्हणून चेन्नई IPLमधला सर्वात यशस्वी संघ!

chennai super kings
युएइमध्ये (UAE) सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम (IPL 2020) आयोजित करण्यात आला. सध्याच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास मुंबई इंडियन्सचा संघ टॉपवर आहे, मात्र पहिल्यांदाच चेन्नई सुपरकिंग्जचा (chennai super kings)संघ पहिल्या चारमध्ये नाही. CSKने तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. एवढेच नाही तर दरवर्षी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव संघ आहे. या संघाला संपूर्ण देशातून चाहत्यांचं प्रेम लाभलं आहे. मात्र पहिल्यांदाच एका दिग्गज क्रिकेटपटूनं CSKच्या विजयाचं रहस्य सांगितले आहे.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासातील चेन्नई सुपर किंग्ज (chennai super kings) हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. 2016 आणि 2017 ही दोन वर्षे वगळता चेन्नई सुपर किंग्जचा आलेख नेहमी चढता राहिला आहे. 2016, 17 या वर्षी मॅच फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघाचं निलंबन करण्यात आलं होतं पण यातून त्यांनी उंच भरारी घेत 2018 या वर्षीचे आयपीएल विजेतेपद पटकावलं तसेच 2019 या वर्षी उपविजेतेपदावर नाव कोरलं.

मात्र आयपीएल २०२० च्या सीरीजमध्ये चित्र थोडे वेगळं आहे आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये चेन्नईला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यांत त्यांना विजय मिळवता आला तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्यांना विजयाचा सूर पुन्हा सापडला आहे. या सामन्यामध्ये चेन्नईने शेन वॉट्सन आणि फाफ ड्युप्लेसिस यांनी 181 धावांच्या विक्रमी भागीदारी केल्यामुळे CSKने हा सामना 10 विकेट राखून जिंकला.

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाची कमान भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे आहे. CSKच्या यशामध्ये धोनीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते CSK चा संघ आपल्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉट्सन हा आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून वॉट्सन फॉर्ममध्ये नव्हता. मात्र CSK संघाने त्यावर विश्वास ठेवून त्याला खेळण्याची संधी देत राहिले. त्या संधीचं वॉटसनने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानं सोनं करून दाखवलं. वॉट्सननं 53 चेंडूत 83 धावा केल्या.

इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रॅमी स्वान म्हणाला की, CSK संघ हा नेहमी त्यांच्या खेळाडूंवर विश्वास ठेवतो आणि पाठिंबा देत असतो हेच त्यांच्या विजयाची गुपित आहे. तसेच वॉट्सन वर विश्वास ठेवल्याबद्दल त्याने CSK संघाचे तसेच व्यवस्थापन टीमचे कौतुक केले आहे.