raj thackeray


politics- महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (raj thackeray) टोला लगावला आहे.


पुण्यात संजय राऊत  (sanjay raut)यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते म्हणाले, राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं, त्यांची नेमणूक केंद्राकडून होत, पण राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा, घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. 

Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेले नव्हते, २ जी घोटाळ्यात मंत्र्यांची नावे आली होती, म्हणून राष्ट्रपतींकडे गेलो होतो. शरद पवार आमचे नेते आहेत, राज्यपाल शरद पवारांना नेता मानतात त्याचे स्वागत करतो, पण राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवे. राज्यपालांना शरद पवारांचे मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा, राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली.

तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा (politics) केंद्रबिंदू पुणे आहे, बाळासाहेब ठाकरे असताना ते मुंबईत होतं, मात्र आता सगळे प्रमुख नेते पुण्यात आहे. सरकारला १ वर्ष होणार नाही असं काही लोकांना वाटत होतं, परंतु हे होणारच होतं असं मला नेहमी वाटत होतं, सरकार कोसळण्याचा कालावधी देत होते, पण आता सरकारला १ वर्ष पूर्ण होतंय, 

महाविकास आघाडी सरकार पूर्ण ताकदीनं चालेल, मधला काळ संकटात गेला. संपूर्ण लढाई उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात चांगल्यारितीने लढली गेली. मुख्यमंत्र्यांनी आरोग्यविषयक संकट राज्यावर आले त्याचं नेतृत्व स्वत: केलं, त्यामुळे हानी कमी झाली नाहीतर अराजकता दिसली असती असंही संजय राऊत म्हणाले.