Main Featured

'ओ मुख्यमंत्री महोदय घराबाहेर निघा!'

cm uddhav thackeray

politics- घराबाहेर पडल्यावर एकट्या तुम्हालाचं करोना होतो का? अशी विचारणा भाजपा नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)यांना केली आहे. 'राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे,' असं त्यांनी म्हटलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. कोरोना काळातील राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना दानवेंनी खास आपल्या स्टाईलमध्ये शाब्दिक फटकेबाजी करत मुख्यमंत्र्यावर टीका केली.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ


मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा!

'देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, पण ते किती जिल्ह्यात गेले आणि आताचे मुख्यमंत्री (cm uddhav thackeray) किती ठिकाणी जाऊन आले. मला सांगू नका तुम्हीच विचार करा आणि आपापल्या गावात जाऊन सांगा,' असं कार्यक्रमात उपस्थित लोकांना दानवे म्हणाले. 'मी लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, ग्रामीण, शहर सगळीकडे फिरलो. मुख्यमंत्री महोदय आम्ही म्हणतो घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. एकट्यालाच खातो की काय कोरोना?,' अशी टीका रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली. (politics)

राजा घराच्या बाहेर आलाचं पाहिजे

'राजा घराच्या बाहेर आला पाहिजे, लोकांत गेला पाहिजे, प्रजेत सामील झाला पाहिजे. त्यांचं दुख समजून घेतलं पाहिजे. हे आपलं माझं कुटूंब, माझी जबाबदारी आहे' असं नुसतंच म्हणून काही होत नसतं, असं दानवे म्हणाले. 'आमच्या काळात मोबाईल नेहमी व्हायब्रेट करायचा. काही तरी मदतीचा एसएमएस यायचा. आता लोक मोबाइल उघडून पाहतो आणि खिशात ठेवतो,' असा टोला त्यांनी लगावला.