sanjay raut
politics in india-
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र संजय राऊतांच्या (sanjay raut) या टीकेवर मनसेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. तसेच फोटो ट्विट करुन 'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत' असं म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.Must Read

1) अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार येस बँकेच्या ताब्यात

2) अल्पवयीन मुलीवर पुण्यात सामूहिक बलात्कार

3) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जमीन घोटाळा केल्याचा गंभीर आरोप

4) PHOTOS: 'मिर्झापूर 2' मधील डिप्पी खऱ्या आयुष्यात आहे भलतील ग्लॅमरस, See Pics

5) टवटवीत आणि चमकदार त्वचेसाठी नियमित करा फक्त 6 योगासनं

पुण्यातील पत्रकार परिषदेत संजय राऊत (sanjay raut)  यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी राज्यपालांची घेतलेल्या भेटीवरही टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असताना राज ठाकरे यांनी राज्यपालांना भेटणे अयोग्य आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता केली होती. (politics in india)

दरम्यान, सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती.