Main Featured

Donald Trump म्हणतात, करोनाची बाधा होणे म्हणजे दैवी आशीर्वाद!

donald trump
करोनाची (corona) बाधा झालेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump)यांनी व्हिडिओ संदेश जारी करत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. करोनाची बाधा होणे हा देवाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले. करोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याशी सामना करता येणाऱ्या औषधांची माहिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. करोनाच्या आजारावर व्हाइट हाउसमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. व्हाइट हाउसमध्ये आल्यानंतर ट्रम्प यांनी पहिल्यांदा व्हिडिओ संदेश जारी केला. यामध्ये त्यांनी रुग्णालयात करण्यात आलेल्या उपचाराचे कौतुक केले. सर्व अमेरिकन (united state) नागरिकांनाही करोनावरील औषधे मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले.

करोनाच्या आजारातून पूर्णपणे बरे झाले नसतानाही ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याबाबत काही तज्ञांनी चिंता व्यक्त केली होती. ट्रम्प यांचे फिजिशन डॉ. शॉन कॉनली यांनी सांगितले की रुग्णालयातून डिस्चार्ज होण्यासाठी आवश्यक असलेले मानके ट्रम्प पूर्ण करत होते.


ट्रम्प (donald trump) यांच्या प्रकृतीबाबत योग्य माहिती समोर येत नसल्याबद्दल काहींनी चिंता व्यक्त केली. ट्रम्प यांना रुग्णालयात नेताना ऑक्सिजन लावण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगण्यात आले होते. ट्रम्प यांना dexamethasone देण्यात आले होते. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, अशा रुग्णांनाच dexamethasone देण्यात येते. त्यामुळे ट्रम्प यांच्याबाबत विरोधाभास असणारी माहिती समोर येत असल्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेचे (united state)राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना आजारावर केलेल्या पोस्टवर फेसबुक आणि ट्विटरने कारवाई केली. ट्रम्प यांनी करोनाचा आजार हा तापाच्या आजारापेक्षा कमी धोक्याचा असल्याचा दावा करणारी पोस्ट केली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ट्रम्प यांची पोस्ट चुकीची माहिती असल्याच्या श्रेणीत टाकली होती.