coronavirus-positive

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपराजिता आद्य (Aparajita Adya) यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. करोनामुळे त्यांच्या ‘रन्नाबना’ या मालिकेचे चित्रीकरणही पुढे ढकलण्यात आलं आहे.

Must Read

1) शिवसेना खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्याची सुपारी

2) येस बँकेप्रमाणेच पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक ठेवीदारांना...

3) CSK च्या सुपर फॅनचे दिड लाख फिटले; धोनीनं खुद्द घेतली दखल (VIDEO)

4) खासदार उदयनराजे सरकारवर भडकले

5) राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी

करोना संसर्गाच्या प्रमाणात घट

देशात चोवीस तासांतील करोनाच्या संसर्गाबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकूणच देशभरात करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाच गेल्या चोवीस तासांत ४३,८९३ नवे रुग्ण आढळून आले. तर ५८,४३९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७९,९०,३२२ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ५०८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १,२०,०१० वर पोहोचली आहे. त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत १५,०५४ अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याने देशात सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,१०,८०३वर पोहोचली आहे.