russia


रशियात (russia) एक नाही तर दोन लशी आल्या पण भारतात लस (corona vaccine) कधी उपलब्ध होणार असा सवाल उपस्थित होत होता. मात्र आता पुण्यात सर्वात मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या लशीबाबत पुण्यातून मोठी बातमी येत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 

अदार पूनावाला म्हणाले आहेत की ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका परीक्षेच्या निकालाच्या आधारावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविड -19 लशीसाठी (corona vaccine)  आणीबाणी परवान्यासाठी अर्ज करू शकणार आहे. या लशीच्या सुरक्षेबाबत सध्या कोणताही प्रश्न नाही. मात्र दीर्घकाळ काय परिणाम होतात ते समजण्यासाठी किमान 2 ते 3 वर्षांचा वेळ जावा लागेल असंही ते म्हणाले.

Must Read 

डिसेंबरपर्यंत कोरोनाची लस येईल मात्र त्यासाठी इमरजन्सी ही लस वापरण्यासाठी परवाना मिळणं आवश्यक आहे. जर ही परवानगी मिळाली नाही तर कोरोनाची लस जानेवारीपर्यंत भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकते. सर्व मानवी चाचण्या पूर्ण केल्यानंतर जानेवारीत ही लस येईल अशी माहिती देखील पूनावाल यांनी दिली आहे.

ऑक्सफोर्ड आणि सीरम इन्सिस्टीट्यूटनं तयार केलेल्या याा लशीची चाचणी ब्रिटनमध्ये देखील सुरू आहे. त्यांनी हा डेटा सर्वांना दिला तर आपत्कालीन चाचणीसाठी आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज करणं सहज सोपं होईल. आरोग्य मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर ही लस डिसेंबरच्या मध्यापर्यंत भारतात उपलब्ध होऊ शकेल असंही पूनावाला यांनी सांगितलं आहे.

भारतात काय आहे कोरोनाची स्थिती?

भारतात गेल्या 24 तासांत 48,648 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 563 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 5,94,386 रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून 57,386 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात 73,73,375 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.