Main Featured

नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे

construction of the hall

इचलकरंजी येथील नगरपालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बांधण्यात येत असलेल्या पण रखडलेल्या सभागृहाच्या बांधकामासाठी आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी शहरातून वर्गणी गोळा करुन देण्याचा इशारा दिल्यानंतर नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी गुरुवारी  मक्तेदार आदित्य बिल्डकॉन यांना बांधकाम कामाचा कार्यादेश प्रदान करणेत आला.

वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील रुपये 2 कोटी 12 लाख 10 हजार 504 रुपये मंजूर निधीतून नगरपरिषदेच्या दुसर्‍या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात आले. या सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला आहे. परंतु विविध कारणांनी ते काम अनेक वर्षापासून रखडलेले होते. नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी वेळोवेळी नगरपरिषदेला निवेदन देण्यासह विविध मार्गांनी आंदोलनेही छेडली. परंतु त्या संदर्भात काहीच निर्णय होत नव्हता.

MUST READ

Advertise

या महत्वाच्या प्रश्‍नाकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पुन्हा आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी डी. एस. डोणे यांनी नगरपरिषदेला या सभागृहाच बांधकाम सुरु करणे जमत नसेल तर बांधकामासाठी शहरातून वर्गणी गोळा करून देऊन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करु, असा इशारा दिला. त्यावर नगरअभियंता संजय बागडे यांनी, योजनेला मुदतवाढ मिळाली असून उर्वरीत बांधकामासाठी चारवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु कोणीही निविदा भरल्या नाहीत. आता निविदा आली असून सभागृहाचे बांधकाम लवकरच काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. चर्चेअंती नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी, या कामासंदर्भात मक्तेदारास वर्कऑर्डर देत आगामी 4 महिन्यात सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती सौ. किरण खवरे, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, प्रकाश मोरबाळे, शिक्षण सभापती राजु बोंद्रे, मागासवर्गीय कल्याण सभापती सौ. संध्या बनसोडे, नगरसेवक अजित जाधव, अब्राहम आवळे, संजय केंगार, मंगेश कांबूरे, राजाभाऊ कांबळे, डि.एस.डोणे, नाना पारडे, राजु रजपुते, अविनाश कांबळे, रॉबिन कांबळे, अमर कांबळे, योगेश माने यांचेसह उपशहर नगरअभियंता राधिका हावळ आदी उपस्थित होते.येथील नगरपालिकेच्या दुसर्‍या मजल्यावर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बांधण्यात येत असलेल्या पण रखडलेल्या सभागृहाच्या बांधकामासाठी आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी शहरातून वर्गणी गोळा करुन देण्याचा इशारा दिल्यानंतर नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी गुरुवारी  मक्तेदार आदित्य बिल्डकॉन यांना बांधकाम कामाचा कार्यादेश प्रदान करणेत आला.

वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत सन 2017-2018 या आर्थिक वर्षातील रुपये 2 कोटी 12 लाख 10 हजार 504 रुपये मंजूर निधीतून नगरपरिषदेच्या दुसर्‍या मजल्यावर सभागृहाचे बांधकाम सुरु करण्यात आले. या सभागृहाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला आहे. परंतु विविध कारणांनी ते काम अनेक वर्षापासून रखडलेले होते. नियोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे यासाठी आंबेडकरी चळवळीतील संघटनांनी वेळोवेळी नगरपरिषदेला निवेदन देण्यासह विविध मार्गांनी आंदोलनेही छेडली. परंतु त्या संदर्भात काहीच निर्णय होत नव्हता.

या महत्वाच्या प्रश्‍नाकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी पुन्हा आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांची भेट घेतली. यावेळी डी. एस. डोणे यांनी नगरपरिषदेला या सभागृहाच बांधकाम सुरु करणे जमत नसेल तर बांधकामासाठी शहरातून वर्गणी गोळा करून देऊन सभागृहाचे बांधकाम पूर्ण करु, असा इशारा दिला. त्यावर नगरअभियंता संजय बागडे यांनी, योजनेला मुदतवाढ मिळाली असून उर्वरीत बांधकामासाठी चारवेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु कोणीही निविदा भरल्या नाहीत. आता निविदा आली असून सभागृहाचे बांधकाम लवकरच काम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले. चर्चेअंती नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी, या कामासंदर्भात मक्तेदारास वर्कऑर्डर देत आगामी 4 महिन्यात सभागृहाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, बांधकाम सभापती सौ. किरण खवरे, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते, प्रकाश मोरबाळे, शिक्षण सभापती राजु बोंद्रे, मागासवर्गीय कल्याण सभापती सौ. संध्या बनसोडे, नगरसेवक अजित जाधव, अब्राहम आवळे, संजय केंगार, मंगेश कांबूरे, राजाभाऊ कांबळे, डि.एस.डोणे, नाना पारडे, राजु रजपुते, अविनाश कांबळे, रॉबिन कांबळे, अमर कांबळे, योगेश माने यांचेसह उपशहर नगरअभियंता राधिका हावळ आदी उपस्थित होते.