Corona Update  : इचलकरंजी शहर दिवसेंदिवस कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रूग्णांच्या संख्येत कमालीची घट दिसून येत आहे.  मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार विविध सहा भागात सहा रूग्ण आढळून आले.

Advertise

Must Read

1) कोल्हापुरी! ऑनलाईन दुकानात आता घरबसल्या मिळणार अस्सल कोल्हापुरी चप्पल

2) महाविकासआघाडी सरकार हे बिघाडी सरकार आहे : हर्षवर्धन पाटील

3) प्रेग्नन्सीची न्यूज दिल्यानंतर अनिता हसनंदानी शेअर केले असे PHOTO

4) शुल्लक कारणावरुन रिक्षाचालकाला मारहाण; VIDEO

5) डोक्यात लोखंडी रॉडने वार करत पत्नीला संपवलं

रूग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभरात एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार आज अखेर शहरात 3931 रूग्णांची नोंद झाली आहे. 3658 जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आजअखेर 191 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 82 जणांवर उपचार सुरू आहेत. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शांतीनगर, लालनगर, विक्रमनगर, वर्धमान चौक, सातपुते गल्ली, नाईक मळा आदि भागात प्रत्येकी एक रूग्ण आढळून आले.