car accidentkolhapur-
 
कोल्हापूरमध्ये कळंबे बावडा रोडवर मारुती कार आणि एस. टी बसममध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातांमध्ये (accident)चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. 

अंत्यविधीला जातानाच काळाने डाव साधला आणि या अपघातांमध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यामुळे कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची (accidentमाहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

Must Read

1) नाथाभाऊ आज करणार सीमोल्लंघन, हातातील ‘घड्याळा’त दुपारी दोनची वेळ जुळवणार

2) अजित पवार यांच्या अमित शाहांना शुभेच्छा

3) सलमान खानशी पंगा घेणारी 'बिग बॉस 14' कंटेस्टंट रुबीना दिलाइक खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

4) रुग्णालयात कोरोना रुग्णाला काठीनं मारहाण; आरोग्य कर्मचाऱ्याच्या दादागिरीचा VIDEO VIRAL

5) केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन


विक्रमनगर कोल्हापूर येथील माळवे कुटुंबीय हे कळे (तालुका गगनबावडा) येथील नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी चालले होते. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजता कणकवली आगराची एसटी गाडी व मारुती कार (MH 09 BW 41 41) यांची समोरासमोर धडक झाली. 

यामधील जखमी व्यक्तींना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले आहे.हा अपघात इतका भीषण होता की मारुती कार पुढच्या बाजूने पूर्णपणे बसच्या इंजिनमध्ये शिरल्याचं फोटोमध्ये दिसतेय.