उत्सवाच्या हंगामात जर तुम्ही तुमच्या घरी नवी चारचाकी आणण्याचा विचार करत आहात, तर टाटा मोटर्स तुमच्या खिशाची काळजी घ्यायला सज्ज आहे. टाटा मोटर्स कमीत-कमी ईएमआयमध्ये कार घरी नेण्याची ऑफर देत आहेत. ग्राहक फक्त 799 रुपयांच्या किमान हप्त्यात टाटा मोटर्सची (tata motors)कोणतीही कार खरेदी करू शकतात.

Must Read

या किमान हप्त्याच्या योजनेसाठी टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेशी हातमिळवणी केली आहे. या योजनेमुळे टाटा मोटर्सच्या भारत स्टेज -6 मध्ये सर्व कार, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) आणि इलेक्ट्रिकल वाहनांचा फायदा होईल.


एका निवेदनात टाटा मोटर्सने (tata motors) म्हटले आहे की, उत्सवाच्या हंगामात विक्री वाढविण्यासाठी आणि उत्पादनाला प्रवेश सुलभ करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank)सहकार्याने 'ग्रॅज्युएट स्टेप अप स्कीम' आणि 'टीएमएल फ्लेक्सी ड्राइव्ह स्कीम' या दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर 2020 अखेरपर्यंत उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे.