Main Featured

सॅनिटाझरमुळे कारमध्ये अग्नितांडव, NCP नेता यांचा होरपळून मृत्यू

car burnराष्ट्रवादीचे (NCP)नेते संजय शिंदे यांच्या कारला चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर 13 ऑक्टोबरला आग लागली होती. महामार्गावर द बर्निंग कारचा थरार झाला होता. ही आग खूप जास्त भडकल्यामुळे संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांच्या गाडीतली आग ही सॅनिटायझरमुळे (sanitizer)भडकली असल्याची माहिती मिळाली आहे.

Must Read

कोरोनाग्रस्त क्रिस्टियानो रोनाल्डोने तोडला 'नियम'


संजय चंद्रभान शिंदे (वय 55 रा.साकोरे मिग) हे MH-15,FN- 4177 या मारूती सुझुकी सियाझ (maruti suzuki)  त्यांच्या कार ने साकोरा येथून नाशिककडे जात असताना साकोरा फाट्याजवळ धावत्या कारने पेट घेतला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगितलं जात होतं. या आगीचा मोठा भडका उडण्याचं कारण सॅनिटायझर होतं. गाडीत असलेल्या सॅनिटाझरमुळे (sanitizer)आगीनं रौद्ररुप धारण केलं आणि गाडी लॉक झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर द बर्निग कारची अंगावर थरकाप उडणारी घटना घडली आहे. कारमध्ये अडकल्यामुळे चालकाचा जागेवर जळून कोळसा झाला आहे. या कारमध्ये मृत संजय शिंदे यांची पत्नी विमल शिंदे या साकोरा मिग येथील उपसरपंच आहेत. त्यांच्या जाण्याने साकोरा मिग गावावर शोककळा पसरली.