Main Featured

हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा


                                         brahmakamal-in-himalay भगवान ब्रह्मदेवाने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मकमळ निर्माण केले अशी आख्यायिका आहे. हे दुर्लभ फुल घरात फुलणे अतिशय पवित्र मानले जाते. उत्तराखंडच्या रुपपुंड या हिमालया (Himalayasतील बेसकॅम्पच्या मैदानावर अतिशय मोहक आणि सुंदर ब्रह्मकमळांचा मळाच सध्या फुलला आहे. समुद्रसपाटीपासून 14 ,700 या फूट उंचीवर हिमालयाच्या पायथ्याशी हा अफलातून आणि नेत्रदीपक मळा फुलला आहे. छायाचित्रात या मळ्याच्या पाठी हिमालयातील बर्फाच्छादित नंदाघूंघटी आणि त्रिशूल ही हिमशिखरे दिसत आहेत. या भागात सप्टेंबरमध्ये जोरदार पाऊस झाल्याने ऑक्टोबर महिन्यातही येथे ब्रह्मकमळांचा बगीचा फुललेला दिसत असल्याचे वनस्पती शास्त्रज्ञांचे मत आहे.