Main Featured

बिग बॉस 14 वर बहिष्काराची मागणी; टास्क पाहून भडकले युजर्स

big boss
Entertainment  news- ‘बिग बॉस’ (big boss) हा रिअ‍ॅलिटी शो आणि वादांचे जुने नाते आहे. अनेकदा हा शो वादात सापडला. म्हणूनच टीव्हीवरचा सर्वाधिक वादग्रस्त म्हणून हा शो ओळखला जातो. ‘बिग बॉस’चा 14 सीझन सुरु होऊन आठवडा होत नाही तोच हा शो वादात सापडला असून आता या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावर ‘#BoycottBB14 ’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. आता असे का तर हा शोमधील एक टास्क.


‘बिग बॉस 14’  (big boss)च्या अपकमिंग एपिसोडचा एक प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो एका टास्कचा आहे. यात बिग बॉस घरातील स्पर्धक मुलींना इम्युनिटी मिळवण्याची संधी देतात. पण यासाठी या मुलींना सिद्धार्थ शुक्लाला आपल्या अदांनी रिझवायचे आहे. प्रोमोत पवित्रा पुनिया, रूबीना दिलैक, जास्मिन भसीन, निक्की तंबोली बाईकवर बसलेल्या सिद्धार्थसोबत रेन डान्स करताना दिसतात. 

आपल्या मादक अदांनी रिझवताना दिसतात. आज गुरुवारी हा एपिसोड आॅन एअर होणार आहे. मात्र त्यापूर्वीच या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा प्रोमो आणि असे टास्क आक्षेपार्ह आणि अतिशय अश्लील असल्याचे अनेक लोकांखे मत आहे. त्यामुळे ट्विटरवर #BoycottBB14  हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.


बिग बॉसला बॅन करण्याची वेळ आली आहे. गेल्या सीझनमध्ये हिंसेला प्रमोट केले होते आणि या सीझनमध्ये अश्लिलता पसरवली जातेय, असे एका युजरने लिहिले. ‘टास्कच्या नावावर अश्लिलला खपवली जाणार नाही. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आणखीही अनेक पर्याय आहेत. हा टास्क एंटरटेनिंग नाही तर चीप आहे,’असे अन्य एका युजरने लिहिले.दुस-या एका युजरने बिग बॉसवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘दरवर्षी या शोवर बहिष्कार टाकण्याची मागणी होते. पण कोणीच यावर बहिष्कार टाकत नाही. पण किमान कोणती दृश्य प्रेक्षकांना भडकवू शकतात, याचे तर भान हवे, ’ असे या युजरने लिहिले आहे.