Main Featured

प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…


 

maratha-reservation-udaynraje-bhosale

indian politics : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा संघटनांनी 10 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर ( Adv. Prakash Ambedkar) यांनी पाठींबा जाहीर केला. मात्र त्याचवेळी त्यांनी कोल्हापूर आणि सातारच्या राजांवर पातळी सोडून टीका केली. दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे, असे कुठे वाचनात आलेले नाही. एक राजा तर बिनडोक असल्याचे मी म्हणेन, तर दुसरे संभाजी राजे (Sambhaji Raje) यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका बरोबर आहे. पण ते आरक्षण सोडून इतर गोष्टींवर अधिक भर देत असल्याचे दिसते, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यांच्या वक्तव्यामुळे वादाला निमंत्रण मिळाले आहे.

Advertise

प्रकाश आंबेडकर यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी मराठा आरक्षणासाठी सध्या उदयनराजे व संभाजीराजे हीरहीरीने भूमिका मांडत आहेत. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करावे अशी काही लोकांकडून मागणी होत आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारले असता आंबेडकर यांनी उदयनराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर एक राजे तर बिनडोक असा उल्लेख केला. त्यांना घटनाच माहित नाही, आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर सगळ्याचे आरक्षण रद्द करा, अशी भूमिका घेणाऱ्या माणसाला भाजपने राज्यसभेतच कसे पाठविले हा प्रश्न पडतो? असा टोला आंबेडकर यांनी लगावला. उदयनराजे यांना तुम्ही थेट आंगावर घेत आहात, असे पत्रकारांनी विचारले असता, मी कुणालाही भ्यालो नाही आणि भित देखील नाही, असे आंबेडकर म्हणाले.

संभाजी राजे यांनी आरक्षणाच्या मुद्दय़ावर भूमिका घेतली आहे. पण ते इतर मुद्द्यावरच अधिक भर देत आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे महाराष्ट्रातील सामंस्जय बिघडताना मला दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबा असे सरकार म्हणते आहे. दुसरीकडे संघटना आक्रमक होतात त्यातून कलह निर्माण होण्याची शक्यता दिसत आहे म्हणून महाराष्ट्रातील सामंस्जय बिघडू नये असे मला वाटते. मराठा आरक्षणचा मुद्दा बाजूला पडून भलत्याच गोष्टींवर चर्चा होताना दिसते. आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठीच हा बंद आहे. तसेच आम्ही अगोदरच आरक्षणला पाठींबा दिल्यामुळे बंदला देखील पाठींबा असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

एमपीएससी परीक्षांना विरोध नको

एमपीएससीच्या परीक्षेला विरोध करणारे मराठा नेते मराठा आरक्षणाच्या पायावर धोंडा पाडून घेतायत. एमपीएससीची परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि त्याची अंमलबजावणी व्हायला हवी. एमपीएससीची परीक्षा हा सर्वच समाजातील विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे एमपीएससी परीक्षांना विरोध नको, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून परीक्षा होऊ द्याव्यात अशी सूचना आंबेडकर यांनी केली.

साताऱ्यात उदयनराजेप्रेमींची प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात निदर्शने

मराठा आरक्षण प्रश्नावरून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayan Raje Bhosale) यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात साताऱयात आज निदर्शने करण्यात आली. यावेळी डॉ. आंबेडकर यांचा ‘वाचाळवीर’, असा उल्लेख करत त्यांनी पुन्हा असे बेताल वक्तव्य केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राजे प्रतिष्ठान व उदयनराजेप्रेमींनी दिला.