महाविकास आघाडी सरकारमध्ये (maha vikas aghadi) काही दिवसांपूर्वी  कामासाठी निधी मिळत नसल्याचे आरोप करत काँग्रेस (Congress) आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनीच 'काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही' असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा धुसफूस वाढण्याची चिन्ह आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी परभणीच्या दौऱ्यावर होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.  यावेळी, 'काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. नांदेडलाही निधी मिळाला नाही, पण मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री आहे, त्यामुळे निधी मिळवून दिला', असं चव्हाण यांनी सांगितले.

Must Read 

1) 'सिंघम'ची हिरोईन अडकली लग्नाच्या बेडीत PHOTO VIRAL

2) राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप

3) रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस

4) ‘तारक मेहता’च्या ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी

5) तुमची कंगना तर आमची उर्मिला !

6) 'आशिकी गर्ल'चं बॅकलेस फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल


पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रस्त्यांवरील खड्डे बुझवण्याबद्दल आरोप केला आहे, असा सवाल विचारला असता, अशोक चव्हाण म्हणाले की, ' मुळात चंद्रकांत पाटील यांच्याकडे असलेले खड्डे बुजवण्याचे काम माझ्याकडे आले आहे, तेच मी करत आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यात चांगले रस्ते झाले पाहिजे, यासाठी मी विमानाने नाहीतर कारने फिरत आहे', असं म्हणत सणसणीत टोला लगावला.

त्याचबरोबर, 'महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना शिवसेनेसोबत एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. त्यावेळी दिल्लीतील नेत्यांमध्ये सेनेसोबत जाण्याबद्दल नाराजी होती. इतर राज्यांमध्ये भाजपकडून काँग्रेसला संपवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे, असं दिल्लीतील नेत्यांना मी पटवून दिले. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीत सामील झालो', असंही अशोक चव्हाण यांनी सांगितले.