Main Featured

Big Billion Days Sale 2020- स्मार्ट टीव्हीवर ५० टक्केंची सूट

Flipkart Big Billion Days Sale 2020
Flipkart Big Billion Days Sale 2020 : सण-उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, टीसीएलचा सब ब्रँड असलेल्या आयफॉल्कनने फ्लिपकार्टवरील (flipkart) आगामी बिग बिलियन डेज आणि बिग दिवाली सेलसाठी स्मार्ट टीव्हींवर (Smart TV) ५० टक्क्यांपर्यंतची सवलत जाहीर केली आहे. विक्रीच्या या जोरदार उत्सवात या टीव्ही ब्रँडने 4K क्यूएलईडी टीव्ही (५५-इंच) ५१,९९९ रुपयांना; (६५-इंच) ६९,९९९ रुपयांना आणि K71-4K युएचडी टीव्ही (४३-इंच, ५५- इंच आणि ६५- इंच) अनुक्रमे २५,९९०, ३५,९९९ आणि ५३,४९९ रुपयांना सादर केला आहे.

नक्की वाचा 

1) हिमालयात फुलला दुर्मिळ ब्रह्मकमळांचा मळा

2) एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी       का?

3) देशाला पहिला ऑस्करचा मान पटकावून देणाऱ्या मराठमोळ्या भानू अथैय्या यांचं निधन

 4)  कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

5) नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन पायाभूत चाचणी

उत्सवात आनंद आणि उत्साह वाढवण्यासाठी ब्रँडने आणखी एक नवे यूएचडी मॉडेल K61-4K युएचडी आणले असून ते २२,९९० रुपयांच्या आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. सवलतीत उपलब्ध स्मार्ट टीव्ही (Smart TV) मॉडेलमध्ये क्वांटम डॉट, हँड्सफ्री व्हॉइस कंट्रोल, डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉससह अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

हँड्स-फ्री एआयसह एच-71- 4K क्यूएलईडी : मेटलिक बॉडी असलेल्या या मॉडेलमध्ये फुल-स्क्रीन पाहण्याचा अत्यंत खरा आनंद मिळवण्यासाठी बेझल-लेस डिझाइन आहे. क्वांटम डॉट टेक्नोलॉजी आणि डॉल्बी व्हिजनद्वारे अवर्णनीय रंगसंगती आणि स्क्रीन ब्राइटनेस मिळतो.

हँड्स फ्री एआयसह के71- 4Kयुएचडी : मेटलिक बॉडी आणि स्लिम डिझाइन असलेले हे उपकरण पारंपरिक एलईडी टीव्हीपेक्षा (LED TV) आकर्षक दिसते. रुम डेकोरेशनसाठी हे उत्कृष्ट मॉडेल असून एखाद्या भिंतीवर शोपीसप्रमाणे तो लावता येतो. मग चालू असो वा बंद स्थितीत.

अमर्याद मनोरंजनासाठी K 61-4K युएचडी: आयफॉल्कनच्या सध्याच्या पोर्टफोलिओत नव्याने समाविष्ट झालेल्या K61 मध्ये अँड्रॉइड टीव्ही सिस्टिम असून २० पेक्षा जास्त प्री इन्स्टॉल्ड कंटेंट अॅप आहेत. याद्वारे यूझरला अमर्याद कंटेंटचा आनंद मिळतो तसेच आवाजी नियंत्रणाद्वारे जगाची सैर (Flipkart Big Billion Days Sale 2020)करता येते.