bank-holiday-check-out-full-list

सणासुदीच्या काळात बँकांना असलेल्या सुट्या लक्षात घेऊन कामाचं नियोजन करावं लागतंय. हल्ली ऑनलाईन बँकिंग (Online bankingमोठ्याप्रमाणात सुरू झालं असलं तरी, बँकेला सुटी हा नेहमीच गैरसोयीचा विषय असतो. आता नोव्हेंबर महिन्यात ही गैरसोय जास्ती होणार आहे. दिवाळी आणि शनिवार रविवारच्या सुट्या मिळून आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं हे सुट्ट्यांचे दिवस पाहून बँकांच्या कामाचं नियोजन करावं लागणार आहे.

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड

नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आणि गुरुनानक जयंती हे सण आहेत. त्यातील 14 नोव्हेंबरच्या दिवाळीच्या दिवशी बँकांना सुटी आहे. तर, शेवटच्या आठवड्यात तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यात शनिवार ,रविवार आणि गुरुनानक जयंतीच्या सुटीचा समावेश आहे. म्हणजेच सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक यांनी या सुट्या पाहून बँकांच्या कामांचे नियोजन करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्या बँकांना सक्तीच्या असतात. काही राज्यांमध्ये स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्याही देण्यात येतात. 

नोव्हेंबरमधील सुट्या अशा

1 नोव्हेंबर - रविवार
8 नोव्हेंबर - रविवार 
14 नोव्हेंबर - दुसरा शनिवार आणि दिवाळी 
15 नोव्हेंबर - रविवार 
22 नोव्हेंबर - रविवार 
28 नोव्हेंबर - चौथा शनिवार 
29 नोव्हेंबर - रविवार
30 नोव्हेंबर - गुरुनानक जयंती