#Power of Social Media-baba ka dhaba

#Power of Social Media- गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर 'बाबा का ढाबा' असा ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडद्वारे एक व्हिडिओ व्हायरल (social media) झाला आहे. या व्हिडिओद्वारे एका वृद्धाने आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा हा व्हिडओ पाहtन अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. 

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


दिल्ली येथील मालवीय नगर येथे ८० वर्षीय वृद्ध आपल्या पत्नीसोबत खाद्य पदार्थांचा गाडा चालवतात. त्यांनी त्याचे नाव  'बाबा का ढाबा' असे दिले आहे. पण त्यांच्या ढाब्यात जेवण करण्यासाठी कोणी येत नाही. त्याच्या या परिस्थितीचा व्हिडिओ एका युजरने सोशल मीडियावर (social media) शेअर करत त्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडिओ पाहताचा वृद्ध जोडप्याच्या मदतीला अनेक कलाकार आणि खेळाडू धावले आहेत. 

व्हायरल झालेल्या व्हिडिओत नेमकं काय म्हटलं आहे? 

कांता प्रसाद आणि  बादामी देवी असे या वृद्ध जोडप्याचे नाव आहे. दोघे मिळून  मालवीय नगर येथे खाद्य पदार्थांचा छोटासा गाडा चालवतात. या जोडप्याला दोन मुल आणि एक मुलगी आहे. मात्र, तिघांमधील कोणीही त्यांच्या मदतीला येत नाहीत. 


लॉकडाऊनपूर्वी लोक ढाब्यावर जेवण करण्यास येत होते. परंतु आता कोणीही फिरकलेले नाही. असे सांगताना कांता प्रसाद यांना अश्रू अनावर झाले. पोटाची खळगी भरण्यासाठी दोघांनी खाण्याच्या पदार्थांचा गाडा सुरू केला. सकाळी ६ वाजता सुरू करून ९ पर्यंत जेवण तयार करून ठेवतात, असे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. 

हा व्हिडिओ व्हायरल होताच त्यांच्या ढाब्यावर लोकांची गर्दी जमू लागली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बाबा का ढाबा या टेंडसह #Power of Social Media असा ट्रेंड सुरू आहे. 

या वृद्ध जोडप्याच्या मदतीला भारतीय क्रिकेट संघाचा स्पिन गोलंदाज आर अश्विन, आयपीएल फ्रेंचाइजी दिल्ली कॅपिटल्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आदी मदतीला धावले आहेत.