asika-sunil-share-saree-pic-instagram

अभिनेत्री रसिका सुनील छोट्या पडद्यावरील 'माझ्या नव-याची बायको' मालिकेत शनाया ही भूमिका साकारते आहे. शनाया Shanaya भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारतेय. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाते आहे. मध्यंतरी रसिकाने पुढील शिक्षणासाठी ही मालिका सोडली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी तिची पुन्हा या मालिकेत एंट्री झाली आहे. 

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील Rasika Sunil हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. सोशल मीडियावर रसिका अॅक्टिव्ह असते. रसिकाचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत तिने साडी परिधान केली आहे.


एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे. गुलाबी रंगाच्या साडीत रसिकाने स्वॅग दाखवला आहे. 'पलट'असे फोटो कॅप्शन तिने दिले आहे.  या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. रसिकाने हा फोटो मालिकेच्या शूटिंग दरम्यान काढलेला दिसतोय. कारण यात गॅरी म्हणजेच अभिजीत खांडकेकरला तिने फोटोची कर्टसी दिली आहे.