Main Featured

पहिल्यांदाच लाँच झालं 9,900मध्ये Appleचं प्रॉडक्ट

iPhone 12Technology- बहुप्रतिक्षित iPhone 12चा लाँच इव्हेंट नुकताच पार पडला. या इव्हेंटमध्ये iPhone 12, iPhone 12Pro, iPhone 12 Pro Max, iPhone 12 Mini असे आयफोनची नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आली आहेत. आयफोन्सची सगळी मॉडेल्स 5G आहेत. तसंच यामध्ये OLED डिस्प्ले आणि A14Bionic चिपसेट देण्यात आली आहे. 

भारतामध्ये ही नवीन सीरिज 30 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, Appleने पहिल्यांदाच 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एक प्रॉडक्ट लाँच केलं आहे. Appleच्या HomePodची किंमत 9,900 असणार आहे.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...iPhone 12 Pro Max- या फोनमध्ये LiDAR सेंसर देण्यात आला आहे. लो लाईट फोटोग्राफी करण्याची आवड असणाऱ्यांना हे फिचर अत्यंत फायदेशीर ठरु शकतं. iPhone 12 Pro Maxमध्ये 3 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेरा सेटअपमध्ये लो लाईट फोटोग्राफी, ऑप्टिकल इमेज स्टेबेलाजेशन आणि 5X ऑप्टिकल झूम लेन्स देण्यात आली आहे.

 iphone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max ची भारतातील किंमत 1,19900 ते 1,29900 रुपये या रेंजमध्ये आहे. यामध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि पॅसिफिक ब्लू असे रंग देण्यात आले आहे.

iPhone 12 - या आयफोनची विशेष गोष्ट अशी की, iPhone 12च्या फ्रंट कॅमेरामध्ये नाईट मोडचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसंच या फोनमध्ये देण्यात आलेला प्रोसेसर आर्टिफिशियल इंटलिजन्स आणि लर्निंग बेस्ड Appsदेखील सपोर्ट करणार आहेत.  iPhone 12मध्ये A15Bionic चिपसेट देण्यात आली आहे. 

iPhone 12चा प्रोसेसर सर्वात फास्ट आहे. अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसंच यात 2 रिअर कॅमेरा देण्यात आले आहेत.  iPhone 12 आणि iPhone12Pro Mini 64GB, 128GB, 256GB या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत. तसंच हिरवा, काळा, पांढरा आणि निळा अशा 4 रंगामध्ये या फोन्सची मॉडेल्स ग्राहकांना घेता येतील. या फोनची भारतातील किंमत 79,900 पासून 69,900 रुपये या रेंजमध्ये आहे.