Entertainment News amesha patel troll
Entertainment Newsबॉलिवूड (bollywood) अभिनेत्री अमिषा पटेल सिनेमात दिसत नसली तरी सोशल मीडियावर (social media)मात्र प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. अलीकडे अमीषाने असाच एक व्हिडीओ शेअर केला. पण तिचा तो बोल्ड व्हिडीओ (bold video)पाहून नेटक-यांनी तिला जबरदस्त ट्रोल केले.

Must Read

1) आमदारानं 19 वर्षांच्या मुलीशी केलं लग्न

2) मराठमोळी नेहा पेंडसे एथनिक ड्रेसमध्ये दिसते झक्कास..! Photos

3) राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराला 12 लाखांचा दंड

4) शिक्षक भरती घोटाळ्यात भाजपा नेत्याला अटक

5) Video: १०३ वर्षीय आजोबांनी १४ हजार फुटांवरुन मारली उडली


या व्हिडीओमध्ये अमीषा बाल्कनीत आहे आणि आपल्या केसांशी खेळतेय. यात तिने पांढ-या रंगाचा टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. अमीषाचा हा व्हिडीओ पाहून नेटक-यांची सटकली. मग काय, अनेकांनी तिची खिल्ली उडवली.काही लोकांनी तिला आंटी  तर काही जणांनी चक्क म्हातारी म्हटले. एका पठ्ठ्याने तर अशा व्हिडिओंमुळेच समाजात चुकीचा संदेश जातो असे म्हणत, अमीषाच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त (social media) केला. अर्थात अमीषाच्या काही चाहत्यांनी मात्र तिला पाठिंबा देत तिच्या लूकचे कौतुक केले.

अमीषा गेल्या अनेक वर्षात ती कोणत्याही सिनेमामध्ये काम करताना दिसली नाही. गतवर्षी बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये मात्र घराच्या मालकीणीच्या रूपात ती दिसली होती. मात्र काहीच एपिसोडनंतर ती गायब झाली होती. 

२००० मध्ये ‘कहो ना प्यार है’  या अमिषाच्या पहिल्याच चित्रपटाने  तरुणांना अक्षरश: वेड लावले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, या चित्रपटासाठी अमिषा ही पहिली चॉईस नव्हतीच. राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशनला लॉन्च करण्यासाठी ‘कहो ना प्यार है’ बनवण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटासाठी करिना कपूरचे नाव फायनल केले. पण ऐनवेळी आईच्या सल्ल्यानुसार करिनाने हा चित्रपट करण्यास नकार दिला. 

करिनाच्या नकारानंतर राकेश रोशन यांनी या चित्रपटासाठी नव्या चेह-याचा शोध सुरु केला. याचदरम्यान कुणीतरी त्यांना अमिषाचे नाव सुचवले. राकेश रोशन अमिषाला भेटले आणि तिच्या सौंदयार्पेक्षा तिच्या हुशारीवर फिदा झालेत. तिच्या विचारांनी ते इतके प्रभावित झालेत की, ‘कहो ना प्यार है’साठी त्यांनी तिला साईन केले.‘कहो ना प्यार है’ने पुढे इतिहास रचला. या सिनेमाने अभिनेता हृतिक रोशनला एका रात्रीत स्टार बनवले, तर अमिषा पटेललासुद्धा बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख प्राप्त करुन दिली.  पुढच्याच वर्षी ‘गदर एक पे्रमकथा’ हा तिचा दुसरा सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमाही सुपरडूपर हिट ठरला. या सिनेमातील चुलबुली शकीनाच्या भूमिकेमुळे अमिषाच्या लोकप्रियतेत वाढ झाली होती.