alaya-furniturewala-dubai-celebratingबाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackerayयांचा नातू आणि स्मिता ठाकरे (Smita Thackeray) यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरेचा वाढदिवस दुबईत दणक्यात साजरा झाला. जंगी पार्टी रंगली. मात्र या पार्टीत एका बॉलिवूड चेह-याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चेहरा कोणाचा तर बॉलिवूड अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिचा.

होय, ऐश्वर्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अलाया दुबईला पोहोचली. ऐश्वर्याच्या वाढदिवसांच्या पार्टीत ती सामील झाली. या पार्टीचा एक व्हिडीओ स्मिता ठाकरे यांनी शेअर केला आहे. यात ऐश्वर्य केक कापताना दिसतोय. या व्हिडीओ अलाया नाही. मात्र स्मिता यांनी हा व्हिडीओ शेअर करताना अलायाला टॅग केले आहे. ऐश्वर्य यानेही इन्स्टास्टोरीमध्ये आई स्मिता व अलायाला टॅग केले आहे.Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

अलायानेही शेअर केलेत फोटो

अलायानेही दुबईतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती यॉटवर पोज देताना दिसतेय. तिच्या मागे फोटोत बुर्ज अल अरब दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी अलाया (Alaya furniturewalaच्या बर्थ डे पार्टीला ऐश्वर्यही हजर होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. शिवाय या फोटोची जोरदार चर्चाही रंगली होती. अलाया आणि ऐश्वर्य यांची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या दोन वर्षांत ते एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स बनले आहेत. अलायाच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला देखील ऐश्वर्यने आवर्जून उपस्थिती लावली होती.  

 पूजा बेदी (Pooja Bedi) ची लेक आहे अलाया

 अलाया अभिनेत्री पूजा बेदीची लेक आहे. पूजाने 1990 साली फरहान फर्निचरवालासोबत लग्न केले. पूजाला दोन मुले आहेत अलाया आणि ओमर. पती फर्निचरवालापासून पूजाने 2003 साली घटस्फोट घेतला होता. शारीरिक छळाचे कारण तिने सांगितले होते.  अलाया फर्निचरवालाने नुकतीच बॉलिवूडमध्ये ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाद्वारे एंट्री घेतली आहे. या चित्रपटातील अलायाच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. हा चित्रपट पाहाताना  अलायाचा हा डेब्यू चित्रपट असल्याची जाणीव देखील होत नसल्याचे अनेकांनी या चित्रपटाच्या रिव्ह्यूमध्ये म्हटले होते. 

अलाया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तिचे विविध अंदाजातील फोटो पोस्ट करत असते. ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात अलायाने सैफ अली खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या चित्रपटातील तिचा अभिनय, तिचे सौंदर्य आणि अदांनी रसिकांवर मोहिनी घातली होती.