Main Featured

अजित पवार यांनी उडवलीय झोप

ajit pawar
politics- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची चांगलीच झोप उडवलीय. हे दोन्ही नेते पुण्यातील कोरोनाच्या साथीच्या विरोधात एकजुटीने येऊन काम करीत आहेत. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने पवार हे आठवड्यात किमान चार ते पाच दिवस भल्या सकाळीच महापौरांना फोन करून शहरातील कोरोनाची (coronavirus) परिस्थिती आणि उपाय योजना यांचा आढावा घेतात.

Must Read

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...

अजित पवार (ajit pawar) यांच्या कामाची स्टाईल अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. सकाळी सहा वाजताच ते कामाला सुरुवात करतात. कोरोनाच्या गेल्या सहा- सात महिन्यात पवार यांनी सातत्याने लक्ष घालून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. याचा खरा अनुभव घेतलाय तो महापौर मुरलीधर मोहोळ यांनी. कोरोनाच्या (coronavirus) या लढाईत महापौर मोहोळ हेही आघाडीवर होते. 

सुरवातीच्या टप्यात तर सर्व लोकप्रतिनिधी घरात बसले असताना महापौर मात्र शहराच्या प्रत्येक भागात जाऊन काम करीत होते. त्यामुळेच अजित पवार यांनीही पुण्यातील प्रत्येक निर्णयात महापौरांना विश्वासात घेण्याचे काम केले. अधिकाऱ्यांच्या प्रत्येक बैठकांना ते महापौरांना समवेत घ्यायचे.  त्यामुळे किमान आता सहा महिन्यांनंतर पुण्यातील कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.  (politics)

याबाबत महापौर म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून आठवड्यातील किमान चार ते पाच दिवस अजितदादा यांचा सकाळी सहा ते सातच्या दरम्यान फोन यायचा. पुण्यातील परिस्थितीचा ते आढावा घ्यायचे, त्यावर काय उपाययोजना करता येतील याबाबत चर्चा करतात. अगदी काल मंगळवारीही अजित दादा यांचा सकाळी सात वाजताच फोन आला होता. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता घटत आहे. मात्र, केंद्राच्या पथकाने पुन्हा दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे महापौर गाफील राहू नका अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी केल्याचे महापौरांनी सांगितले. 

दरम्यान, पवार आणि मोहोळ यांची ही जवळीक भाजप (BJP)आणि राष्ट्रवादीतील (NCP)अनेकांना खटकतही होती. त्याबाबत राष्ट्रवादीच्या शहराच्या काही पदाधिकाऱ्यांनी थेट पवार यांची भेट घेतली होती. तर भाजपमधून मोहोळ यांच्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या दोन्ही नेत्यांनी पक्षभेद विसरून कोरोनाच्या संकटात एकत्र येऊन काम केल्याचे पुणेकरांनी बघितले.