Main Featured

महाराष्ट्र अडचणीत, व्यक्त केली मोठी चिंता!

Maharashtra

Maharashtraकोरोना काळात (corona) महाराष्ट्र राज्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. राज्यात बेरोजगारी वाढली आहे. बेरोजगारीचा दर 20.9 टक्के आहे. गेल्या 6 महिने महत्त्वाचे व्यवहार बंद असल्याने मोठा आर्थिक (financial)फटका राज्य सरकारला बसला आहे. याबाबत अर्थ मंत्रालयानं मोठी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना काळात महाराष्ट्र राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे. इतकंच नाहीतर राज्यातील बेरोजगारी दर 20.9 टक्के झाला आहे. पुनःश्च हरिओमनंतर राज्यातील बेरोजगारी दर जुलै महिन्यात 3.9% पर्यंत घसरला होता.

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


राज्यातील आर्थिक परिस्थिती नेमकी काय आहे? याबाबत अर्थ मंत्रालयानं नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यासमोर प्रेझेंटेशन केलं. यामध्ये राज्यातील अर्थव्यवस्था, महसुलातील नुकसान ते अनेक महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली.


पण राज्य सरकारनं अनलॉक करण्याचा निर्णय घेऊनही स्थानिक पातळीवर काही ठिकाणी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे पुन्हा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस बेरोजगारी दर 6.9 टक्क्यांवर आला. सध्या राज्यासमोर सगळ्यात मोठी चिंता ही बेरोजगारी दराबाबत असल्याचं अर्थ मंत्रालयानं (financial) स्पष्ट केलं आहे.


मनरेगाअंतर्गत काम कमी झाली आणि खरिपाचा हंगाम संपल्याचा देखील परिणाम झाल्याचं यात सांगण्यात आलं. कोरोना काळात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर एप्रिल महिन्यात बेरोजगारी (unemployment) दर 5.8 टक्क्यावरून थेट 20.9 टक्क्यांपर्यंत गेल्यानंतर मे मध्ये हा दर सुधारत 15.5 टक्क्यांपर्यंत गेला. मात्र, राज्यात पुनःश्च हरिओम सुरू झाल्यानंतर जूनमध्ये हा दर 9.2 टक्के तर जुलैमध्ये 3.9 % पर्यंत गेला. 


पण तरीही काही ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे ऑगस्टमध्ये हा दर 6.2 टक्क्यापर्यंत वाढला. त्यामुळे एकूणच अनलॉक आणि लॉकडाऊनच्या भूमिकेबाबत सातत्य न ठेवल्यानं हे चित्र राज्यात निर्माण झाल्याचं मत अर्थमंत्रालयानं व्यक्त केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील अर्थव्यवस्थेसमोर 'बेरोजगारी'चं मोठं संकट उभं असल्याचं स्पष्ट झालं आहे.


अर्थ मंत्रालया प्रेझेंटेशनमधील इतर महत्त्वाचे मुद्दे...


-राज्याचे जीएसटी (GST)परतावा कमी आल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक संकटात भर पडली आहे.

-बेरोजगारी (unemployment)आणि नोकऱ्या जाणे ही मोठी समस्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसमोर आहे.

-उद्योग आणि सेवा क्षेत्र अजूनही अडचणीत आहे. त्यांना या संकटातून बाहेर यायला वेळ लागेल.

-पण कृषी क्षेत्राला फार फटका बसलेला दिसत नाही.

-ऑक्टोबर, नोव्हेंबरमधील सण उत्सवांमुळे अर्थव्यवस्था चालना मिळू शकते, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे.

- पण तुर्तास राज्यातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचे समोर येत आहे.