bollywood gossip
bollywood gossip- अभिनेत्री मालवी मल्होत्रावर वर्सोवा परिसरात एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केला. मालवीवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी योगेश महिपाल सिंहला माझ्या चेहऱ्यावर हल्ला करायचा होता, असा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.

मालवीने सांगितलं, “कॅफेमधून मी घरी परतत असताना त्याने मला रस्त्यातच गाठलं. त्याने चाकूने (knife)माझ्या पोटावर वार केला आणि नंतर त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता. मी माझ्या हातांनी चेहरा झाकायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझ्या उजव्या हातावर चाकूने वार केला.” (bollywood gossip)

Must Read

1) सांगलीत आज आपत्ती व्यवस्थापन कक्षासह तीन कामांचे लोकार्पण

2) विराट कोहलीने सांगितलं आरसीबीच्या हरण्यामागचं कारण

3) लवकरच पुरुषांसाठीही गर्भनिरोधक औषध

4) सरकारने लागू केली आरोग्य विम्याची नवी योजना

2) IPL 2020 : बुमराहचा स्पेशल रेकॉर्ड


जानेवारी महिन्यात कामानिमित्त योगेशला दोन-तीन वेळा भेटल्याची कबुली मालवीने या मुलाखतीत दिली. त्यानंतर एका तामिळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उटीमध्ये दोघांची पुन्हा भेट झाली. त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत असल्याचं तिने स्पष्ट केलं. “तिसऱ्या भेटीदरम्यान त्याने मला प्रपोज केलं आणि लग्नाची मागणी घातली. मी फार नम्रतेने त्याला सांगितलं की हे शक्य नाही आणि त्यानंतर त्याला भेटण्याचं टाळत होते. मात्र त्यानंतर त्याने मला फुलं पाठवण्यास सुरुवात केली. कधी अचानक माझ्या बिल्डिंगखाली येऊन उभा राहायचा आणि तासनतास थांबायचा”, असं तिने सांगितलं.

लग्नास नकार दिल्याने योगेशने तिच्यावर चाकूने(knife) तीन वेळा हल्ला केल्याचा खुलासा मालवीने केला. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.