Sana Khan leave film industry
बिग बॉस-6 (Bigg Boss 6) ची स्पर्धक आणि बॉलिवूड अभिनेत्री सना खान (Sana Khan) हिने देखील अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट (instagram post)करत याबाबत माहिती दिली. अभिनत्री सना खान देखी जायरा वसीमच्या मार्गावर चालताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या मेसेजमध्ये असे करण्याचे कारण धर्म सांगितले आहे. तिच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हणत अभिनेत्रीने याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…

एक पोस्ट शेअर कर सना खान (Sana Khan)ने असं म्हटलं आहे की, 'माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण. अल्लाह माझ्या या प्रवासात मला करेल आणि रस्ता दाखवेल.' तिने एक नोट या पोस्टमध्ये शेअर केली आहे. ज्यात सना खानने असे म्हटले आहे की, 'बंधू आणि भगिनींनो, मी आता माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या वळणावर येऊन ठेपले आहे आणि तुमच्या बोलते आहे. मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये आयुष्य घालवले आहे. या काळात मला किर्ती, इज्जत आणि संपत्ती मिळाली. माझ्या चाहत्यांकडून हे सर्व मिळाले, ज्यासाठी मी कृतकृत्य आहे.'

Must Read

1) मराठा संघटनांकडून उद्याचा महाराष्ट्र बंद मागे

2) आता येतंय Green Ration Card

3) टीव्ही टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश; ‘रिपब्लिक’सह ३ चॅनल्सची चलाखी

4) क्रीडा विभागातून कुस्तीपटू बबीता फोगटचा राजीनामा

5) COVID-19 : मॉडर्ना कंपनीने कोरोना लशीसंदर्भात घेतला मोठा निर्णय

6) प्रकाश आंबेडकर यांचे वादास निमंत्रण…

तिने पुढे असे म्हटले आहे की, 'मात्र काही दिवसांपासून मला असे वाटत आहे की जगात येण्याचे उद्दिष्ट काय केवळ संपत्ती आणि किर्ती मिळवणे एवढाच आहे का? काय एखाद्याचे हे कर्तव्य नाही आहे का की त्याने त्याचे आयुष्य अशा लोकांसाठी घालवावे जे बेसाहारा आणि बेआसरा आहेत? काय त्याने असा विचार नाही केला पाहिजे का की मृत्यू कधीही येऊ शकतो आणि मेल्यानंतर त्याचे काय होणार आहे? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी शोधतेय. विशेषत: दुसऱ्या प्रश्वाचे उत्तर, मरणानंतर माझे काय होईल?'


सनाने आधी म्हटलेल्या प्रश्नांची उत्तरं ती 'मजहब'मध्ये शोधत आहे. या पोस्टमध्ये (instagram post) तिने Showbizz (फिल्म इंडस्ट्री) सोडत असल्याचे म्हटले आहे.