Mithun Chakraborty and his son
बलात्कार (rape case)व फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.एका पीडितीने महाक्षय व मिथुन यांच्यावर बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

Must Read

1) उद्योग क्षेत्रातील कामगारांना वेतनवाढ मिळण्याची शक्यता

2) आमिर खानच्या मुलीने दिली इन्स्टाग्रामवर धमकी...

3) अ‍ॅमेझॉन अन् फ्लिपकार्टला मनसेचा इशारा

4) लग्नाचं आमिष दाखवून रेपचा आरोप; मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलासह पत्नीवर गुन्हा

5) मंत्रालय, स्वारगेट, कोल्हापूर, अलिबागसाठी ५० शिवशाही

6) 'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ पासून पीडित तरुणी आणि महाक्षय एकमेकांना डेट करत होते. याच दरम्यान महाक्षय उर्फ मेमोने २०१५ मध्ये पीडितेला त्याच्या घरी बोलावलं व तिला शितपेयातून नशेच्या गोळ्या दिल्या. तसंच तिच्यावर बलात्कार (rape case) केला. इतकंच नाही तर त्याने तिला लग्नाचं आमिषदेखील दाखवलं. या काळात त्याने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर मेमोच्या आईकडून पीडितेला गर्भपात (abortion)करण्याची धमकी मिळाल्याचं पीडितेने सांगितलं.

पीडित तरुणीने मेमोला गर्भपात (abortion)करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर मेमोने पीडितेला काही गोळ्या खायला दिल्या. ज्यामुळे तिचा गर्भपात झाला, असा आरोपही तिने केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिता तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. मात्र, तिची तक्रार नोंदवून घेतली नाही असंही तिने फिर्याद देताना सांगितलं. त्यानंतर मेमो आणि मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी यांनी पीडितेला धमकवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, पीडित तरुणी याच दरम्यान दिल्लीला गेली असताना तिने रोहिणी कोर्टात या प्रकरणी न्याय मागण्यासाठी याचिका दाखल केली. या प्रकरणी कोर्टाकडून प्राथमिक पुराव्यांच्या आधारे एफआयआर दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ओशिवारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आता पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.