Main Featured

'या' शहरात Kiss केल्यानंतर उजळेल तुमचं नशीब


Your-luck-will-shine

Kiss
प्रेमी युगुलं आपलं प्रेम अबाधित रहावं आणि लग्न To get married व्हावं यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. जगभराबरोबरच भारतातील काही प्रेमकहाण्या सर्वपरिचित आहेत. लैला-मजनू, शिरीन फरहाद या सर्व जोड्यांना प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मेक्सिकोतही असंच एक शहर आहे जे प्रेमी युगुलांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. त्याचं कारणही विशेष आहे. मेक्सिकोतल्या गुआनायुआटो या शहरातील एका गल्लीमध्ये जर प्रेमी युगुलाने एकमेकांना किस केलं तर त्यांचं प्रेम अबाधित राहतं, अशी कहाणी सांगितली जाते. त्याचबरोबर 15 वर्षं त्यांचं नशीब उजळतं असाही समज आहे. अ‍ॅले ऑफ द किस असं या गल्लीचं नाव आहे. या गल्लीत येऊन किस करण्यासाठी जगभरातील तरुण-तरुणी इथं रांगा लावून उभे असतात.

यामागे आहे ही अजरामर प्रेमकहाणी

Advertise

हे शहर स्पॅनिश लोकांनी 15 व्या शतकात वसवलं. या शहराचं नाव स्थानिक भाषेच्या नावावरून ठेवलं असून गुआनायुआटोचा अर्थ बेडकांचा डोंगर असा आहे. याठिकाणी खूप बेडकं आढळून यायची मात्र आता लोकसंख्या वाढल्यानंतर बेडकांची संख्या कमी झाली आहे. या शहरात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे. त्यामुळे या शहराची लवकर भरभराट झाली आणि आधी ग्रामीण असलेलं स्वरूप आता शहरी झालं आहे.

या  शहरातील या गल्लीचं नाव अ‍ॅले ऑफ द किस पडण्यामागे एक प्रेमकहाणी आहे. 15 व्या शतकात अ‍ॅना ही श्रीमंत घरातील मुलगी आणि कार्लोस हा गरीब घरातील मुलगा या गल्लीतच राहत होता. त्यांचं एकमेकांवर अतिशय प्रेम होतं. पण समाजाच्या विरोधामुळे ते चोरून या गल्लीत भेटायचे. पहिल्यांदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या पण ते त्याला बधले नाहीत. त्यामुळे शेवटी अ‍ॅनाच्या वडिलांनी कटारीने तिचा खून याच गल्लीत केला आणि तिला वाचवताना कार्लोसनेही आपला प्राण गमावला. अशाप्रकारे हे मेक्सिकन प्रेमकहाणी अजरामर झाली. त्यामुळे या प्रेमकहाणीवरून या गल्लीला हे नाव मिळालं आणि ही गल्ली देखील आता प्रेमाचं प्रतीक झाली आहे. असं म्हणतात की याठिकाणी Kiss केल्यास प्रेम अबाधित राहतं, त्यामुळे जगभरातून येणारी प्रेमी युगुलं या गल्लीमध्ये येतात आणि एकमेकांना किस करतात.

इतर ठिकाणीही असेच समज

चीनमधल्या हुआंगशान पर्वतात एका ठिकाणी लव्हर लॉक पाँइंट आहे. तिथं जाऊन प्रेमी युगुलानी कुलूप लावलं की त्यांचं प्रेमबंधन अतूट राहतं असा समज आहे. तैवानची राजधानी तैपेईमध्ये शीहाई मंदिरात पोहोचल्यावर तुमचा जोडीदाराचा शोध संपुष्टात येतो. इथे देवाला साखरेचा नैवेद्य दाखवला की तुम्हाला जोडीदार मिळतो असं मानलं जातं. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील सस्पेंशन पुलावर प्रेमात धोका दिलेली व्यक्ती उभी राहिली की तो पुल तुटतो अशी मान्यता आहे. त्यामुळे असे धोकेबाज इथं जायला घाबरतात. पण महत्त्वाचं हे की हा पुल अजून जसाच्या तसा उभा आहे.