World-record-set-by-breaking-coconut

सोशल मीडियावर
 
social media 

Advertise

नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोकांच्या कला, त्यांनी केलेले अविष्कार पाहून आपण अनेकदा अचंबित होतो. असाच एक थरारक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान हिट होत आहे. मार्शल आर्ट्स शिकलेल्या पी. प्रभाकर रेड्डी यांनी एक विक्रम करुन दाखवला आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच अचंबित व्हाल. पी. प्रभाकर रेड्डी यांनी डोळ्याला पट्टी बांधून एका मिनिटांत 49 नारळ फोडण्याचा विक्रम करुन दाखवला आहे. आणि त्यात आणि त्यातला आणखी महत्त्वाचा ट्वीस्ट म्हणजे, या नारळांमध्ये त्यांच्याच एका विद्यार्थ्याला झोपवण्यात आलं होतं. हे दृश्य पाहताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहील.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पी प्रभाकर यांच्या डोळ्याला पट्टी बांधली आहे आणि राकेश हा त्यांचाच विद्यार्थी रस्त्यावर झोपला आहे. त्याच्या आजूबाजूला नारळ ठेवण्यात आले आहेत. प्रभाकर यांनी एका मिनिटांत डोळ्याला पट्टी बांधून हे नारळ हातोड्याने फोडून दाखवले. अगदी शिताफीने, हुशारीने त्यांनी नारळ फोडून दाखवले आहेत. यावेळी राकेशच्या कोणत्याही अवयवाला जखम झाली नाही. हा विक्रम एवढा थरारक होता की, रस्त्यावर येणारी - जाणारी लोकंही त्यांच्याकडे पाहातच राहिली.

पी. प्रभाकर रेड्डी यांना हा विक्रम करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. अनेक वर्षांपासून ते मार्शल आर्ट्स करत आहेत. आजपर्यंत अनेकांना त्यांनी मार्शल आर्ट्सचे धडे दिले आहेत. त्यांच्या या विक्रमाचं सध्या प्रचंड कौतुक केलं जातंय. विशेष म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record)मध्येही या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे.