Will-Uddhav-Thackeray-and-Aditya-go-to-Bihar?

बिहार विधानसभा निवडणुकीचं (bihar election 2020) बिगुल वाजलं असून जवळपास सगळे राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. त्यात शिवसेना (Shiv Sena) देखील बिहार निवडणूक लढवणार आहे. शिवसेना 50 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनेच्या 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray आणि खासदार संजय राऊत यांच्यासह 12 नेते महाराष्ट्रातील आहेत. शिवसेनेनं माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधात आपला उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

शिवसेनेनेच्या 20 स्टार प्रचारकांची यादी....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदित्य ठाकरे

सुभाष देसाई

संजय राऊत

चंद्रकांत खैरे

अनिल देसाई

विनायक राऊत

अरविंद सावंत

गुलाबराव पाटील

राजकुमार बाफना

प्रियंका चतुर्वेदी

राहुल शेवाले

कृपाल तुमाने

सुनील चिटनिस

योगराज शर्मा

कौशलेंद्र शर्मा

विनय शुक्ला

गुलाबचंद दुबे

अखिलेश तिवारी

अशोक तिवारी

गुप्तेश्वर पांडेंच्या विरोधातही उमेदवार देणार

बिहारमध्ये स्थानिक पक्ष हे शिवसेनेशी हातमिळवणी करण्यासाठी इच्छुक आहेत. त्या पक्षांबाबतही निर्णय घेण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. बिहारमध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत निवडणूक लढवू शकते, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई (MP Anil Desai) म्हणाले, सुशांत सिंह प्रकरणात खोटा प्रचार करण्यात आला. खोटी माहिती पसरविण्यात आली. महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कारस्थान रचलं गेलं, पण आता सगळं चित्र स्पष्ट झालं आहे.

देवेंद्र फडणवीस हे भाजपकडून निवडणुकीचं नियोजन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची बदनामी करू नये असा टोलाही त्यांना हाणला. बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांच्या विरोधातही शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. बिहारमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नाही तसेच चिन्ह दुसऱ्या पक्षाचे असल्याने आयोग देईल त्यातलं एक चिन्ह आम्ही निवडू अशी माहितीही त्यांनी दिली.

सुशांत सिंह (Sushant Singh) हा बिहारचा असल्याने त्याच्या मृत्यू प्रकरणावरून बिहारमध्ये मोठं राजकारण झालं होतं. सुशांतला न्याय मिळाला पाहिजे असं म्हणत भाजप आणि जनतादल युनायटेडने हा मुद्दा प्रचारात उतरविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आणि एम्सच्या निर्वाळ्यानंतर परिस्थिती बदलली आहे.

दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने NDAमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविणार नसल्याचं पक्षाने जाहीर केले आहे. चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

LJP हा NDAमधून बाहेर पडला तरीही त्या पक्षाने भाजपची साथ सोडलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपशी संबंध कायम राहणार असल्याचं पासवान यांच्यावतीने सांगण्यात आलं आहे. पासवान यांनी राज्यात भाजप आणि लोकजनशक्तीचं सरकार आणू असंही म्हटलं आहे. जागावाटपाच्या मुद्यावरून जेडीयू आणि पासवान यांच्या पक्षात मतभेद झाल्याने पासवान यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यात जास्त जागांची मागणी केली होती. तर नितिश कुमार हे तेवढ्या जागा सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पासवान यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री पासवान हे आजारी आहेत. त्यामुळे पक्षाची सर्व सूत्र ही चिराग यांच्याकडे आहेत.