Main Featured

2 नोव्हेंबर रोजी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा


 

इचलकरंजी येथे केंद्रातील मोदी सरकारने कामगार आणि शेतकरी विरोधी भूमिका घेऊन त्यांना देशोधडीला लावले आहे. या कामगार आणि शेतकरी विरोधी सरकारला गाढले पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन  लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व पश्‍चिम महाराष्ट्र पेपर विक्रेता संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवगोंडा खोत यांनी केले. दरम्यान, असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या विविध प्रश्‍नासंदर्भात 2 नोव्हेंबर रोजी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Must Read

1) कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगेच्या पातळीत वाढ

2) SBI चा इशारा ! सणासुदीच्या दरम्यान गायब होऊ शकतात तुमच्या अकाऊंटमधील पैसे

3) सतत ‘सेल्फी’ घेता ? ‘हा’ गंभीर आजार तर नाही ना ? या 4 गोष्टी लक्षात ठेवा

4) ही आहेत 5 बेस्ट झिरो बॅलन्स बचत खाती

लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे तिसरे कोल्हापूर जिल्हा अधिवेशन येथील समाजवादी प्रबोधिनीमध्ये   पार पडले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ. भरमा कांबळे यांचे हस्ते झेंडावंदन व क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यात आले. कॉ. शिवगोंडा खोत यांच्या हस्ते उद्घाटन होऊन अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रास्ताविक जिल्हा सेक्रेटरी कॉ. शिवाजी मगदूम यांनी केले. यावेळी प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे व संदीप सुतार यांच्या अध्यक्ष मंडळाची निवड करुन अधिवेशनाचे कामकाज पार पाडले.

यावेळी मेडीक्लेम योजना चालू करा, बांधकाम कामगारांच्या मुलांना लॅपटॉप आणि टॅबलेट व स्मार्ट फोन द्यावेत, ऑफलाईन नोंदणी काम चालू करा, आगामी दिवाळीसाठी बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये बोनस द्यावा, सुरक्षा कीट देतानाच्या बोगस चाचण्या बंद करुन त्यातील भ्रष्टाचाराची ताबडतोब चौकशी करावी आदी ठराव मांडण्यात आले. तसेच आगामी काळात त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अधिवेशनाला अंध अपंग संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी कॉ. धनाजी जाधव, फेरीवाला संघटनेचे नेते कॉ. सदा मलाबादे यांनी शुभेच्छा दिल्या. शेवटी जुन्या कमिटीने नवीन 27 लोकांच्या कमिटीची नांवे सूचविली. त्याला उपस्थित प्रतिनिधीनी एकमताने मान्यता दिली.