Trump's-big-statement

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

Advertise

यांना करोनाची लागण झाली होती. परंतु रुग्णालयात केवळ तीन दिवस उपचार घेतल्यानंतर ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतले होते. व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी चीनवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच करोना विषाणूच्या प्रादुर्भावाबद्दल चीनला दोषी ठरवल. दरम्यान, चीननं जगासोबत जे काही केलं त्याची किंमत त्यांना चुकवावीच लागेल, असं मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं.