Towards-Satyamev-Jayate'

politics
 पार्थ पवार Parth Pawar
 यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल 'सत्यमेव जयते'च्या दिशेने सुरू आहे, असं मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

बीडमधील विवेक रहाडे या युवकाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागे होऊन आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारने हा गुंता सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी पार्थ यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी पार्थ पवार हे 'सत्यमेव जयते'च्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

Advertise

चंद्रकांत पाटील Chandrakant Patil म्हणाले...


पदवीधर निवडणुकीसाठी निवडून येण्याची क्षमता हीच पात्रता

केंद्रातून आरक्षण आणता येत नाही, तो राज्याचा विषय.

करोना प्रकरणी सरकारला दिसत नाही, ऐकू येत नाही, सरकारची संवेदनशीलता संपली आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने धाडी घातल्या पाहिजेत.