Main Featured

गुणवत्तेच्या सरासरीवरून प्रथम व द्वितीय वर्षातील हजारो विद्यार्थी नापास : विद्यापीठ येथे ठिय्या आंदोलन


 

The-sit-in-movement-at-the-universityपूर्वीच्या गुणवत्तेच्या सरासरीवरून कोरोनाच्या काळात परीक्षा न झालेल्या पेपरला गुण दिल्यामुळे प्रथम व द्वितीय वर्षातील हजारो विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. यातून योग्य तो मार्ग काढावा यासाठी अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ (Shivaji University)  येथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात माणूसकी फौंडेशनने सहभाग घेतला.

Advertise

Must Read

1) केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

2) ...तर फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा मार्ग मोकळा

3) चीनला भारी किंमत चुकवावी लागेल; ट्रम्प यांचं मोठं विधान

4) राज्यात चालवणार ५ विशेष रेल्वे; मध्य रेल्वेचा निर्णय

5) MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

मागील सहा महिन्यांपासून देशभरात कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांसह सर्व आस्थापना आणि शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवावी लागली. त्यामुळे वार्षिक परीक्षा न घेता सर्वांनाच पास केले जाणार असे वृत्त प्रसिध्द झाले होते. पण प्रत्यक्षात पूर्वीच्या गुणवत्तेच्या सरासरी लक्षात घेऊन निकाल दिला गेल्याने अनेक विद्यार्थी नापास झाल्याने हतबल झाले आहेत. या अन्यायाने त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ येथे ठिय्या आंदोलन केले. शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासकांच्या सोबत चर्चेत आपले मुद्दे मांडले. त्यावर विद्यापीठातील प्रशासकांनी सात दिवसाची मुदत मागितली. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा  इशारा माणुसकी फौंडेशन व विद्यार्थी कृती समितीने दिला आहे.

आंदोलनात माणुसकी फौंडेशनचे अध्यक्ष रवि जावळे, प्रथमेश इंदुलकर, आकाश नरुटे, इम्रान शेख, आनंद इंगवले, विद्यार्थी बचाव कृती समितीचे अध्यक्ष आकाश चांदणे, ऋषिकेश चव्हाण, सागर प्रजापती, रंकीत रॉय, अनिकेत चावरे, स्टेफन आवळे, सोमनाथ धुमाळ, अनिकेत धातूंडे इतर सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.