Main Featured

MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय


The-final-decision-will-be-taken-by-the-Chief-Minister

Exam
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना ‘MPSCच्या परीक्षा घेऊन नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे. या संदर्भात गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Chief Minister Uddhav Thackeray

Advertise

यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.

या प्रश्नावर बुधवारी नवी मुंबईत बैठक झाली. त्यावेळी बोलताना खासदार संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, या बैठकीत '11 तारखेला जर MPSC ची परीक्षा घेतली तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील' मराठा आरक्षणासाठी नवी मुंबईत मराठा समाजाच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार भाषण करत  राज्य सरकारला इशारा दिला आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता. मुख्यमंत्र्यांनी कुणाशी आणि काय बोलायचं याची विचारणा केली. मी म्हटलं मराठा समाजाची भूमिका स्पष्ट आहे.  तुम्ही बोलावलं तर चर्चेसाठी आम्ही येण्यासाठी तयार आहोत. पण, MPSC च्या 11 तारखेला जर परीक्षा झाल्या तर सरकारला गंभीर परिणाम भोगावा लागेल', असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.

'मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी नेतृत्त्व करणार नाही, तर खांद्याला खांदा लावून लढा देणार आहे. ज्यांना नेतृत्व करायचे आहे. त्यांनी जबाबदारी घेऊन पुढे यावे आणि लढा द्यावा.  पण आज मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहे. मराठा समाजात दुफळी आणण्याचा काही जण प्रयत्न करत आहे. हे दुर्दैवाचे आहे, अशी खंतही संभाजीराजे यांनी व्यक्त केली.