Main Featured

तेजस्विनी पंडित फोटोशूट शेअर करत म्हणाली- "वाट पहाते मी गं...


Tejaswini-Pandit-Photoshoot

अभिनेत्री 
तेजस्विनी पंडित Tejaswini Pandit सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टची माहिती ती चाहत्यांना देत असते. तेजस्विनीने नुकतेच एक फोटोशूट शेअर केले आहे. त्यात तेजस्विनीने स्कर्ट-टॉप घातला आहे आणि सोबत त्याला ट्रेडिशनल टच देत नाकात नथसुद्धा घातली आहे. तेजस्विनी या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसतेय. हे फोटो शेअर करताना तेजस्विनीने, ''झाल्या तिन्ही सांजा करुन शिणगार साजा, वाट पहाते मी गं,येणार साजन माझा.'' असे कॅप्शन दिले आहे.  जितकी ती ऑनस्क्रीन सुंदर दिसते तितकीच ती ऑफस्क्रीनही सुंदर दिसते. 

. मी सिंधुताई सपकाळ, तू ही रे असे सिनेमा, विविध नाटकं आणि १०० डेज सारख्या मालिकेतून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे रसिकांसह तेजस्विनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांचीही लाडकी अभिनेत्री बनली आहे. सिनेमा, रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 तेजस्विनीची आई ज्योती चांदेकर या मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगं बाई अरेच्चा या केदार शिंदेच्या चित्रपटाद्वारे तिच्या करियरला सुरुवात केली.