Strict-salute-to-the-soldiers


Indian Army
 लडाखमधल्या 

Advertise

Ladakhचीन सीमेवर सध्या तणाव आहे. चीनच्या मुजोर आणि आडमुठ्या धोरणांमुळे या भागात गेली अनेक दिवस परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे सैनिकांनाही मोठ्या बिकट परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. मात्र अशा परिस्थितीतही सैनिक अतिशय धीराने त्याला तोंड देत आहेत. सैनिकांना इथल्या स्थानिक लोकांचाही पाठिंबा आणि प्रेम मिळत असून त्याचा एक Video सध्या Social Media वर व्हायरल झाला आहे.

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (Indo-Tibetan Border Police) (ITBP) चुशुल या खेड्यातून जात असताना एक चिमुकला या जवानांना अतिशय कडक सॅल्युट करत असताना त्यात दिसतो आहे. या चिमुकल्याचं नावं नामग्याल असं आहे. सीमेजवळ चोशुल हे गाव असून या भागातून कायम जवानांची ये जा सुरू असते.

जवानांच्या कवायतीही नामग्याल कायम पाहात असतो. त्यातूनच तो सॅल्युट करायला शिकला. सावधान...विश्राम अशी ऑर्डर होताच नामग्याल एखाद्या सराईत जवानासारखाच सॅल्युट करतो. त्याचा हा सॅल्युट बघून जवानांनाही जोश येतो त्यामुळे ITBPच्या जवानांमध्येही नामग्याल चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दिलेल्या आत्मनिर्भर (Atmanirbhar Bharat ) घोषणेचे आता परिणाम दिसून येत आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षामध्ये भारत आणि चीनमध्ये असलेली व्यापर तूट तब्बल 50 टक्क्यांनी कमी झाली आहे. चीनला होणारी भारताची निर्यात वाढली असून आयातीचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे व्यापार तूट घटल्याचं सांगितलं जात आहे. हा चीनला मोठा दणका मानला जात आहे.

भारत आणि चीन सीमेवर असलेला तणाव आणि कोरोनाची महाभयंकर साथ या पार्श्वभीमीवर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताची घोषणा दिली होती. त्यानंतर भारताने चीनच्या Appsवर बंदी घातली. आयात होणाऱ्या चिनी मालावर डंम्पिंग ड्युटी लावली त्यामुळे आयात घटली आहे. भारतात चीन विरोधी वातावरण असल्याने व्यापाऱ्यांनी मालही आयात केला नाही.

याउलट भारताची काही क्षेत्रातली चीनला होणारी निर्यात वाढली आहे. भारताची पोलाद निर्यात तब्बल 8 पट वाढली आहे. त्यामुळेही व्यापार तूट कमी होण्यास फायदा झाला.