इचलकरंजी नगरपरिषदेच्या आवारात सामाजिक कार्यकर्त्याच्या आत्मदहनाची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून वस्त्रनगरीला काळीमा फासणारी आहे. ही घटना दुर्दैवी असली तरी दुर्लक्ष करण्यासारखी किंवा क्षुल्लक कारणावरुन झालेली नाही. त्यामुळे या गोष्टीच्या मूळात जाऊन विचार करणे आवश्यक आहे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Must Read

1) महाविकास आघाडीच्या एकीला सुरुंग?

2) महाराष्ट्र राज्याच्या 'या' विभागात भरती

3) अभिनयानंतर 'या' श्रेत्रात पदार्पण करतेय मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर

4) मुंबई आणि पुण्यासाठी Good News

5) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा

कचरा उठाव करणेचा ठेका घेणार्‍या मक्तेदार आराध्या कंपनीच्या घंटागाडीला बांधून मृत जनावर ओढत घेवून जाणे हे कोणत्या कायद्याला व नियमांना धरुन आहे? त्यामुळे बेकायदेशीर काम करण्यासाठी कंपनीचे संरक्षण या घंटागाडीवर काम करणार्‍या चालकास आहे हेच स्पष्ट होते. भोरे यांच्या तक्रारीवर नगरपरिषदेने केवळ औपचारीक पत्रव्यवहार करुन कारवाईचे केलेले नाटक सर्वजण पहात आहेत. त्यामुळे नगरपरिषदेतील पदाधिकारी, मक्तेदार व प्रशासन यांची घट्ट साखळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लेखी तक्रार करुनही नगरपरिषद प्रशासन व पदाधिकार्‍यांनी तसेच जिल्हा नगरपरिषद प्रशासनाने त्याची दखल गांभिर्याने घेतली नाही. परिणामी एका सामाजिक कार्यकर्त्यांचा दुर्दैवी अंत होण्यात झाला. त्यामुळे घडलेल्या या प्रकाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करुन भोरे यांनी तक्रारीत ज्यांची नावे घेतली आहेत त्यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी, असे बावचकर यांनी म्हटले आहे.