साऊथच्या
 
South चित्रपटांची कथा, कंटेन्ट सगळेच शानदार असते, यात जराही दुमत नाही. या चित्रपटातील हिरोंही जबरदस्त परफॉर्मन्स देत सिनेमात जीव ओततात. तेव्हाच साऊथच्या सिनेमांवर प्रेक्षकांच्या उड्या पडतात. आज साऊथच्या अशाच पाच डॅशिंग हिरोंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. या हिरोंपुढे बॉलिवूडचे हिरोही फिके पडतील, अशी त्यांची स्टाईल आहे.

यश

2008 साली अ‍ॅक्टिंग करिअर सुरु करणारा 33 वर्षांचा यश आज प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. आज यश साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. केजीएफ- चॅप्टर 1 हा यशचा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाचा सीक्वल अर्थात केजीएफ- चॅप्टर 2 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मोगीना मनसू या कन्नड सिनेमातून यशने डेब्यू केला होता. कन्नड सिनेमाचा आजचा तो सर्वाधिक महागडा अभिनेता आहे.

अल्लू अर्जून Allu Arjun

बॉलिवूडमध्ये सलमान खान व शाहरूख खानचे जसे क्रेज आहे तसेच साऊथ इंडस्ट्रीत अल्लू अर्जुन या नावाचे क्रेज आहे. जबरदस्त स्टाईल आणि तितकाच जबरदस्त अभिनय या जोरावर अल्लू अर्जुन साऊथचा सुपरस्टार बनला. प्रामुख्याने तेलगू सिनेमात काम करणाºया अल्लू अर्जुनने गंगोत्री या सिनेमातून डेब्यू केला होता.

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा हा साऊथचा सेन्सेशन म्हणून ओळखला जातो. कॉम्रेड, नोटा, अर्जुन रेड्डी अशा धमाकेदार आणि सुपरडुपर हिट सिनेमात दिसणा-या विजय देवरकोंडाची फॅशन स्टाईलही जबरदस्त आहे. लवकरच विजय बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. एकापाठोपाठ एक हिट देणा-या विजय देवरकोंडाला बॉलिवूड चित्रपट घेण्यास अनेक दिग्दर्शक उत्सूक होते. यासगळ्यांत अखेर दिग्दर्शक कबीर खान यांनी बाजी मारली आहे.

दुलकर सलमान

‘झोया फॅक्टर’ आणि ‘कारवां’ या बॉलिवूड सिनेमात दुलकर सलमानला तुम्ही पाहिले असेलच. तेलगू आणि तामिळ सिनेमाचा सुपरस्टार असलेला दुलकर चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. अगदी बॉलिवूडच्या नव्या हिरोंनाही लाजवेल अशी त्याची स्टाईल आहे.

राणा दुग्गबती

राणाला कोण ओळखत नाही. बाहुबली या ब्लॉकबस्टर सिनेमात त्याने साकारलेली भल्लालदेवची भूमिका तुफान गाजली. साऊथचा आज तो बडा आहे. त्याच्या स्टाईलवर चाहते फिदा आहेत.